Pune Zilla Parishad election: ...पुणे जिल्हा परिषदेच्या उद्याच्या फैसल्याकडे लक्ष; ‘दादांची छाया’ कायम राहणार का?

अजित पवारांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक; सहानुभूतीचा राष्ट्रवादीला फायदा होणार का, आज निर्णय
Ajit Pawar
Ajit PawarPudhari
Published on
Updated on

पुणे : अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे प्रचारात रंगत न आलेल्या जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या सोमवारी(दि.9) होणाऱ्या मतमोजणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्हा हा अजितदादांचा बालेकिल्ला होता, त्यांची छाप तशीच या जिल्ह्यावर राहणार का, दादांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादीला मिळणार का, याचा निर्णय सोमवारी होईल.

Ajit Pawar
MERC Electricity Tariff: वीजदरवाढीवर तिसरी ई-जनसुनावणी; एमईआरसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

पुणे जिल्ह्याची सत्ता हाती मिळविण्यासाठी या वेळी भाजपने फार जोरदार प्रयत्न केले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने सहानुभूतीची लाट दिसून आलेली आहे,अशा वेळी भाजप आपल्या प्रयत्नात किती यशस्वी होणार, याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग््रेासचे दोन्ही गट या निवडणुकीत एकत्र आले होते, त्यामुळे त्यांना यश मिळाल्यास राष्ट्रवादीच्या एकीकरणाच्या योजनेलाही बळ मिळू शकते.

Ajit Pawar
Dhanori Encroachment Removal: धानोरीत महापालिकेची धडक कारवाई; 11,200 चौ.फूट सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त

जिल्हा परिषदेचा सोमवारचा निकाल जिल्ह्यातील आगामी राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पुणे जिल्हा परिषद ही कायमच शरद पवार आणि त्यांच्यानंतर अजित पवार यांच्या ताब्यात राहिलेली आहे, त्यामुळे आता या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जिल्हा परिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे की ज्यामध्ये अजित पवार प्रचाराच्या मैदानात नव्हते, त्यांच्या निधनामुळे पवार कुटुंबातील कोणीच प्रचार केलेला नाही.

Ajit Pawar
Marriage Fraud Pune: लग्नाचे आमिष, प्रेमाचा सापळा अन् आर्थिक फसवणूक; तरुणीकडून 3.45 लाखांचा गंडा

कोणत्याही पक्षात कोठेही तडजोड नाही

जागाच्या वाटपात महायुतीतील कोणत्याच पक्षात कोठेही तडजोड होऊ न शकल्याने या महायुतील सर्व पक्ष वेगवेगळे लढण्याचाही काय परिणाम होतो, हे या निवडणूक निकालातून समजणार आहे. राष्ट्रवादी काँग््रेास जिल्ह्यात सर्वत्र प्रबळ आहे, तर भाजप आणि शिवसेना काही मपॉकेटफमध्ये प्रबळ आहेत, त्यामुळे निवडणूक निकालात काय दिसणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news