Rupali Chakankar Resignation
Rupali Chakankar ResignationPUDHARI

Rupali Chakankar Resignation: पक्षात नसते तर या बाईला पुण्यात फिरू दिलं नसतं... संतापलेल्या ठोंबरेंनी चाकणकरांचं सगळंच काढलं

Published on

Rupali Chakankar Resignation: भोंदू बाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडाली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला. रूपाली चाकणकर आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेला अशोक खारत यांच्या कनेक्शनचे फोटो व्हायरल होत होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रूपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

Rupali Chakankar Resignation
Suhas Babar| भाजपसह सगळे पक्ष मी चालवतो : सुहास बाबर

रूपाली ठोंबरेंची विशेष मुलाखत

आता चाकणकरांचा राजीनामा झाल्यानंतर रूपाली ठोंबरे यांनी पुढारी न्यूजला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक बाबींवर सडेतोड अन् भीडभाड न बाळगता उत्तरं दिली. त्यांनी चाकणकर आणि खरात प्रकरणात एकाच पक्षात असल्यामुळं संयमानं घेतलं आहे नाहीतर चाकणकरांना पुण्यात फिरू दिलं नसतं असं वक्तव्य केलं.

रूपली ठोंबरे यांनी पुढारीशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले, त्या म्हणाल्या, 'माननीय फडणवीसांचे आभार मानते. त्यांनी राज्यातील माता भगिनींना आश्वासित केलं की मी कोणाला सोडणार नाही.' रूपाली ठोंबरे पुढे म्हणाल्या, ही लढाई इथंच संपली नाही. त्याने अनेक महिलांचे शोषण केलं. त्याला शेवटपर्यंत तपास होणं गरजेचं आहे.'

Rupali Chakankar Resignation
Kharat Chakankar Controversy: चाकणकरांच्या अनामिकेला बँडेज... अंधारेंनी दाखवला 'तो' फोटो अन् सोमवती अमावस्येचं कनेक्शन

ठोंबरेंनी या प्रकरणात चाकणकरांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, 'यात चाकणकरांचा हस्तक्षेप आहे. त्यामुळं त्यांना देखील सहआरोपी करा त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे म्हणूनच आम्ही त्यांचा राजीनामा मागितला होता.'

त्या पुढे म्हणाल्या, 'संपदा मुंडे प्रकरणात त्यांनी पीडितेचेच चारित्र्य हनन केलं होतं. हे कायदेशीर गुन्हा आहे. चाकणकर बाईंना सह आरोपी करावं. जे कोण या प्रकरणात समोर येतील त्यांची सर्वांची चौकशी झाली पाहिजे अगदी माझे संबंध जरी उघड झाले तरी माझी चौकशी झाली पाहिजे.'

Rupali Chakankar Resignation
Big Breaking | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

पाणी पळवण्यावरूनही टीका

ठोंबरेंनी चाकणकरांनी महिला आयोगच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी भोंदू बाबा बलात्कारी आहे त्याला देण्यासाठी पत्रव्यवहार केला आणि वर तोंड करून माझे त्यांच्याशी वैयक्तिक कोणते संबंध नाहीत असं म्हणतात अशी जहरी टीका केली.

रूपाली ठोंबरेंनी चाकणकरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी चाकणकरांना त्यांनी थेट सांगितलं की आधी राजीनामा द्या आणि मग बोला. राजीनामा देतानाही या बाईंनी नौटंकी केली की खरात बाबांची चौकशी करावी तुम्हीच तर आरोपी आहात. कोणाला हा खोटारडेपणा दाखवताय. असा घणाघात देखील केला.

निर्लज्जासारखं हसत हसत राजीनामा

निर्लज्जासारखं हसत राजीनामा दिला. इथं त्यानं महिलांचा बलात्कार केला. कुठल्या राजकारणी आहात तुम्ही. आता मी जरी मंदिरात पाया पडायला गेले तर घरचे माझ्याकडे संशयानं पाहतील. अशा भोंदू बाबाला ही बाई मदत करते. २०२५ मध्ये या भोंदू बाबाची भांडेफोड झाली त्यावेळी तुम्ही कारवाई का केली नाहीत. असं म्हणत चाकणकरांवर टीका केली.

चाकणकरांनाच का टार्गेट केलं?

चाकणकरांना का बोलतोय याबाबत उत्तर देतांना ठोंबरेंनी, त्या संवैधानिक पदावर होत्या. त्या चक्क पोलिसांना फोन करतात. याचा (अशोक खरात) तपास करू नका. व्हिडिओ व्हायरल केला त्याला मारा असं पोलिसांना सांगितलं, म्हणून आम्ही चाकणकरांवर बोलतोय.

भोंदू बाबा हा त्यांचा गुरू माऊली आहे असं आपण मानू मात्र हा व्हिडिओ अशा प्रकारे आला आहे. तुम्ही शिर्डी पोलिसांना फोन केला. म्हणजेच त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओमधली व्यक्ती ही त्यांची गुरू माऊली आहे. हे त्यांना कळलं होतं की नाही... की त्यांनी आंधळेपणाने फोन केला होता. चाकणकर खोटं बोलत आहेत. खोटं बोलण्यामुळं त्या या गुन्ह्यात अजून अडकत आहेत. त्याचे पुरावे त्यांनी स्वतः दिले आहेत. असंही रूपाली ठोंबरे म्हणाल्या.

Rupali Chakankar Resignation
Rupali Chakanakar: अशोक खरात प्रकरणाला नवं वळण; रूपाली चाकणकर फरार, रुपाली पाटील ठोंबरेंच्या पोस्टमुळे खळबळ

मी जर पक्षात नसते तर...

रूपाली ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यामुळं मर्यादा आहेत असं मान्य केलं. त्या म्हणाल्या, मी जर त्या पक्षात नसते तर या बाईचं अजून जोरदारपणे तोंड काळं केलं असतं. हिला पुण्यात फिरू दिल नसतं. मी त्या पक्षात आहे म्हणून प्रत्येकवेळी मी संयमानं वागतेय. पक्षात असल्यामुळं मर्यादा येत आहेत. त्या आमच्या पक्षातल्या आहेत म्हणून बाई तुम्ही असेच वागत रहा आम्ही बघत बसतो असं म्हणणार आहोत का आम्ही? असा सवाल देखील त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news