Rupali Chakanakar: अशोक खरात प्रकरणाला नवं वळण; रूपाली चाकणकर फरार, रुपाली पाटील ठोंबरेंच्या पोस्टमुळे खळबळ

Ashok Kharat Nashik Controversy: अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात राजकीय वाद पेटला असून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होत आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांच्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.
Rupali Chakanakar
Rupali ChakanakarPudhari
Published on
Updated on

Ashok Kharat Nashik Controversy Rupali Chakanakar: नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या अशोक खरात प्रकरणाने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या खरातला महिलांवरील अत्याचाराच्या आरोपांवरून अटक झाल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणाशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नावही चर्चेत आलं आहे. खरात यांच्यासोबतचे त्यांचे फोटो आणि एका व्हिडिओत पाद्यपूजेचा प्रसंग व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत चाकणकरांवर निशाणा साधला. त्यांच्या पोस्टमध्ये “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर फरार. बजाव टाली” असा उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) डिजिटल फॉरेन्सिकच्या मदतीने चौकशीला सुरुवात केली आहे. आरोपीचे फोन कॉल्स, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि इतर व्यवहारांची तपासणी केली जात आहे. पीडितांना न्याय मिळवून देणं आणि संपूर्ण नेटवर्क उघड करणं, यावर तपास यंत्रणांचा भर आहे.

Rupali Chakanakar
Ashok Kharat: 'अध्यात्माच्या नावाखाली...', अशोक खरात प्रकरणावर आचार्य तुषार भोसलेंची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. खरातच्या मालमत्तेवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांना एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे सापडली आहेत. या शस्त्राचा परवाना होता का, ते कुठून मिळालं आणि त्याचा वापर कशासाठी केला जात होता, याचा सध्या तपास सुरू आहे.

Rupali Chakanakar
Dhurandhar 2 Ending: 'धुरंधर 2' च्या क्लायमॅक्समध्ये हमजासोबत काय होतं? आदित्य धर पार्ट 3 आणणार का?

याशिवाय, खरातचे काही प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांशीही संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. विविध ठिकाणी जमीन खरेदी, गुंतवणूक आणि बांधकाम व्यवसायात सहभाग अशा अनेक आर्थिक व्यवहारांचा धागा उलगडत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Rupali Patil Thombare
Rupali Patil ThombarePudhari

एकूणच, अशोक खरात प्रकरण केवळ गुन्हेगारीपुरतं मर्यादित न राहता राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरही मोठे प्रश्न निर्माण करत आहे. SIT च्या तपासातून पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news