Kharat Chakankar Controversy
Kharat Chakankar Controversypudhari

Kharat Chakankar Controversy: चाकणकरांच्या अनामिकेला बँडेज... अंधारेंनी दाखवला 'तो' फोटो अन् सोमवती अमावस्येचं कनेक्शन

Published on

Ashok Kharat Rupali Chakankar Controversy: अशोक खरात उर्फ कॅप्टन या हाय प्रोफाईल तांत्रिकाला अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक झाली आहे. यानंतर या अशोक खरातचे राज्यातील अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचे दावा करणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे देखील या अशोक खरात सोबत जवळचे संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. आज शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका पीडितेचा हवाला देत रूपला चाकणकर या स्वतः तंत्र मंत्र विद्या करत होत्या असा दावा केला आहे.

Kharat Chakankar Controversy
Sambhaji Raje| चाकणकरांनी राजीनामा द्यावा : संभाजीराजे

चाकणकर स्वतः करायच्या तंत्र मंत्र?

पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, 'एका पीडितेने सांगितलं की रूपालीताई चाकणकर या स्वतः तंत्र मंत्र विद्या करत होत्या. त्यांनी स्वतःची अनामिका देखील कापली होती. आता ही अनामिका कापणे हे काय प्रकरण आहे हे मला माहिती नव्हतं.'

अंधारे पुढे म्हणाल्या, 'मी या प्रकाराची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जी माहिती मिळाली ती माहिती फार धक्कादायक आहे. अनामिका कशासाठी कापतात... तर तंत्र मंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्वाची असते. कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबधित असते. उर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवणे विशिष्ठ मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे उर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषित केली जाऊ शकते.

Kharat Chakankar Controversy
Rupali Chakanakar: अशोक खरात प्रकरणाला नवं वळण; रूपाली चाकणकर फरार, रुपाली पाटील ठोंबरेंच्या पोस्टमुळे खळबळ

तो फोटो आणि सोमवती अमावस्या

हे कसं केलं जातं याबाबत देखील सुषमा अंधारे यांनी तंत्र मंत्र विद्या जाणणाऱ्या लोकांच्या हवाल्यानं सांगितलं. त्या म्हणाल्या. हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण यांच्याशी जोडलेले आहे. याद्वारे मंत्रोच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षित करणे आणि यश प्राप्त करणे असा हा या तंत्र मंत्र विद्येचा अर्थ आहे.

अंधारेंनी सांगितलं की हे विशिष्ट दिवशीच केलं जातं. हा प्रकार सोमवती अमावस्येला करतात. यानंतर अंधारेंनी चाकणकरांचा एक फोटो दाखवला. या फोटोत चाकणकरांच्या एका बोटाला बँडेज लावलेलं दिसतं. हा फोटो २ सप्टेंबर २०२४ चा असून त्याच दिवशी सोमवती अमावस्या होती. पीडित महिला जर सांगत असेल की राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा सोमवती अमावस्येला तंत्र मंत्र विद्या करत होत्या.

Kharat Chakankar Controversy
Sanjay Raut | अशोक खरात प्रकरण एपस्टिन फाईल्सपेक्षा भयंकर, मुख्यमंत्री गप्प का : संजय राऊत

सुषमा अंधारेंनी याचबरोबर जर रूपालीताई चाकणकर यांना अशोक खरात यांच्या सर्व गुन्ह्यांची माहिती होती. गुन्ह्यात सक्रीय सहभाग होता असा आरोप देखील केला. त्याचबरोबर त्यांनी चाकणकर यांना तातडीनं अटक केली पाहिजे अशी मागणी देखील केली. चाकणकरांची समोरासमोर बसून चौकशी झाली पाहिजे. त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. पीडित महिलेनं चाकणकर तंत्र मंत्र विद्येत सहभागी होत्या असा आरोप केला आहे. त्यामुळं त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून आधी हटवलं पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news