RTE Admission Maharashtra: आरटीई प्रवेश प्रक्रियेचा संथ प्रारंभ; पहिल्या दिवशी केवळ 400 अर्ज

कागदपत्रे अपलोड सक्तीमुळे पालकांचा प्रतिसाद कमी
RTE admission 2026
RTEPudhari
Published on
Updated on

पुणे: इंग््राजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची कवाडे उघडणाऱ्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेला अखेर मंगळवारी सुरुवात झाली. यंदा अर्ज करतानाच कागदपत्रे अपलोड करावी लागत असल्यामुळे राज्यात पहिल्या दिवशी केवळ 400 अर्ज आले. त्यामुळे अर्ज भरण्याची सुरुवात संथगतीने झाल्याचे स्पष्ट झाले.

RTE admission 2026
Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जनिवारण योजनेसाठी 52 लाख शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती संकलित

आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) इयत्ता पहिली ते आठवीसाठी इंग््राजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध केली जाते. त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दि. 17 फेबुवारी ते 10 मार्चपर्यंत पालकांना त्यांच्या मुलांचे अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे.

RTE admission 2026
Baramati Panchayat Samiti Chairman: बारामती पंचायत समिती सभापतिपदासाठी चुरस; तावरे, जगताप, पवार चर्चेत

यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये 9 जानेवारीला शाळानोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आणि मुदतवाढीसह संबंधित प्रक्रिया 30 जानेवारीला बंद करण्यात आली. आता प्रवेशासाठी आठ हजार 651 शाळांची नोंद झाली असून, एक लाख 12 हजार 772 जागा उपलब्ध झाल्या आहेत. पहिल्या दिवशी साधारण 405 अर्ज भरले गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

RTE admission 2026
Bhigwan Girl Kidnapping: भिगवणला पोलीस छावणीचे रूप, वातावरण तणावपूर्ण; जन आक्रोश मोर्चाला परवानगी नाही

ही कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य

  • आई किंवा वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य

  • बालकाच्या जन्माचे प्रमाणपत्र आणि वास्तव्याचा पुरावा अनिवार्य

  • भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांबाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत आवश्यक (सर्व घटकांना अनिवार्य)

  • सामाजिक वंचित घटक (पालकांचा/बालकांचा जातीचा दाखला व अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य) (परराज्यातील जात प्रमाणपत्र ग््रााह्य नाही)

  • आर्थिक दुर्बल घटकातील बालकांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला रुपये एक लाखापेक्षा कमी उत्पन्न (सन 2023-24 किंवा 2024-25) या वर्षातील उत्पन्नाचा दाखला ग््रााह्य समजण्यात येईल.

RTE admission 2026
Deer entering village Velhe: पाण्याच्या टंचाईमुळे आंबीत चितळांची वस्ती; जंगलातून गावाकडे वन्यजीवांचा मोर्चा

पालकांनो, अर्ज भरताना हे लक्षात ठेवा...

  • पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन:पुन्हा तपासून पाहावे

  • बालकाचा अर्ज भरताना जन्म दाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्म तारीख पुन्हा बदलता येणार नाही !

  • सन 2026-27 साठी फक्त 1 किमी अंतरपर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील.

  • प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे.

  • अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे पालकांनी तयार ठेवावीत. लॉटरी लागली आणि कागदपत्रे नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो.

  • अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.

  • बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

  • अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत:जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

  • अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास प्रवेश रद्द होईल.

  • दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40 टक्के आणि त्या पुढील ग््रााह्य धरण्यात येईल.

  • निवासी पुरावा म्हणून गॅसबुक रद्द करण्यात आले आहे.

  • निवासी पुरावा म्हणून राष्ट्रीयीकृत बँकेचेच पासबुक ग््रााह्य असेल.

  • अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून मिळालेले लॅटिट्यूड, लाँगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news