

वेल्हे: उन्हाळ्याची तीवता दिवसेंदिवस वाढत असून, जंगलातील नैसर्गिक पाणवठे, ओढे आणि झरे कोरडे पडू लागले आहेत. गवत-चारा वाळल्याने खाद्याची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, सिंहगड व पानशेत परिसरातील हरीण, भेकर, ससे, रानडुक्कर आदी वन्यप्राणी,तसेच मोर, लांडोर यांसारखे पक्षी पाण्याच्या व अन्नाच्या शोधात नागरी वस्तीकडे व शेती परिसराकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे.
पानशेतजवळील आंबी (ता. हवेली) येथे गेल्या दोन दिवसांपासून चितळ जातीची दोन हरणे मुक्तपणे संचार करताना दिसत आहेत. सायंकाळनंतर अंधार पडल्यावर ही हरणे गावाशेजारील शंकरराव दौलती निवंगुणे यांच्या शेतात मुक्काम करतात. पहाटे उजाडण्यापूर्वीच ती पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून जातात. या हरणांचा कोणताही उपद्रव नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वीही एक चितळ काही महिन्यांसाठी आंबी येथील गोठ्यात वास्तव्यास होते, अशी आठवण ग््राामस्थांनी सांगितली.
वन्यप्राणी नागरी वस्तीकडे वळल्याने ग््राामस्थांमध्ये कुतूहलासोबतच काही प्रमाणात चिंता व्यक्त होत आहे. हरणे निरुपद्रवी असली, तरी त्यांच्या मागोमाग भक्षक प्राणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही स्थानिकांचे मत आहे. तसेच रस्ते ओलांडताना अपघातांचा धोका वाढत असल्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. आंबी येथील जिल्हा काँग््रेासचे कार्याध्यक्ष लहूअण्णा निवंगुणे म्हणाले, मजंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडत असल्याने वन विभागाने ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करावेत. पाण्याची टाकी, टँकरद्वारे पाणीपुरवठा किंवा सिमेंट बंधारे उभारल्यास वन्यजीवांना जंगलातच पाणी उपलब्ध होईल आणि ते नागरी वस्तीकडे येणार नाहीत.
दरम्यान, स्थानिक ग््राामस्थांनी वन्यप्राण्यांना त्रास न देता सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्याच्या काळात वन्यजीवांचे संवर्धन आणि पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे ही काळाची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.
आंबी येथे सरकारी वनक्षेत्र नसले, तरी शेजारच्या रुळे, कादवे परिसरात वनक्षेत्र आहे. या भागात सरकारी तसेच खासगी रानात घनदाट जंगल असल्याने वन्यजीवांचा अधिवास आहे. प्राण्यांना पकडून अन्यत्र सोडणे व्यवहार्य नसून ते काही काळ वास्तव्य करून पुन्हा अधिवास क्षेत्रात परत जातात. वन विभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.
समाधान पाटील, सिंहगड वन विभागाचे परिमंडळ अधिकारी