Baramati Panchayat Samiti Chairman: बारामती पंचायत समिती सभापतिपदासाठी चुरस; तावरे, जगताप, पवार चर्चेत

20 वर्षांनंतर पद खुले; राष्ट्रवादीतून कोणाला संधी याकडे तालुक्याचे लक्ष
Baramati Panchayat Samiti
Baramati Panchayat SamitiPudhari
Published on
Updated on

बारामती: बारामती पंचायत समितीच्या सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. तब्बल 20 वर्षांनंतर सभापतिपद खुले झाल्याने चुरस अधिकच वाढली आहे. सध्या किरण तावरे, दिग्विजय जगताप, जितेंद्र पवार यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत.

Baramati Panchayat Samiti
Bhigwan Girl Kidnapping: भिगवणला पोलीस छावणीचे रूप, वातावरण तणावपूर्ण; जन आक्रोश मोर्चाला परवानगी नाही

नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेासने जिल्ह्यात जोरदार यश मिळवले. बारामती तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व सहा आणि पंचायत समितीच्या दहा जागा विक्रमी मताधिक्याने जिंकत पक्षाने बारामती हा आपला अभेद्य गड कायम ठेवला. पंचायत समितीच्या बारा जागांपैकी दोन जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहेत. सभापतीनिवडीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहेत.

Baramati Panchayat Samiti
Deer entering village Velhe: पाण्याच्या टंचाईमुळे आंबीत चितळांची वस्ती; जंगलातून गावाकडे वन्यजीवांचा मोर्चा

राष्ट्रवादी काँग््रेासच्या दहा सदस्यांपैकीच एका सदस्याची सभापतिपदी निवड होणार आहे. सभापतिपदाच्या निवडीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याने कार्यकर्ते व नागरिकांचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे. आता पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास टाकतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

Baramati Panchayat Samiti
Nimone Accident Krishna Kale: निमोणेतील काळरात्र: आई-वडील गमावूनही आठवीतील कृष्णाचे आजीला धीर

दिग्विजय जगताप देखील प्रबळ दावेदार

निंबूत गणातून विजयी झालेले वाणेवाडीचे माजी सरपंच दिग्विजय जगताप हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी वाणेवाडीचे सरपंचपद भूषविले आहे. त्यांचे चुलते कै. रामराजे जगताप यांनी बारामतीचे पहिले सभापती म्हणून काम पाहिले होते. सध्या त्यांच्या पत्नी गीतांजली जगताप या वाणेवाडीच्या विद्यमान सरपंच आहेत. मितभाषी, अभ्यासू अशी त्यांची ओळख आहे.

जितेंद्र पवार यांचेही नाव चर्चेत

वडगाव निंबाळकर येथील जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि त्या गणातून विजयी झालेले जितेंद्र पवार यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे अंतिम निर्णयापर्यंत राजकीय वातावरणात उत्सुकता कायम राहणार आहे.

Baramati Panchayat Samiti
AI Reels Trend: एआय रील्सची सोशल मीडियावर धूम; तरुणाईमध्ये नवा डिजिटल ट्रेंड

किरण तावरे यांचा दांडगा जनसंपर्क

पणदरे गणातील सदस्य किरण तावरे हे मजबूत दावेदार आहेत. तब्बल 29 वर्षे पक्षसंघटनेत सक्रिय राहून त्यांनी काम केले आहे. संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष, पक्षाचे युवकाध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय व निष्ठावंत म्हणूनही त्यांची ओळख आहे. अभ्यासू, सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व आणि तालुक्यात दांडगा जनसंपर्क, ही त्यांची जमेची बाजू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news