Bhigwan Girl Kidnapping: भिगवणला पोलीस छावणीचे रूप, वातावरण तणावपूर्ण; जन आक्रोश मोर्चाला परवानगी नाही

अपहृत मुलगी व आरोपींचा शोध सुरू; कडकडीत बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Bhigwan Girl Kidnapping
Bhigwan Girl KidnappingPudhari
Published on
Updated on

भिगवण: भिगवण जवळील २१ वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणी येथील वातावरण तणावपूर्ण असुन, पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान मंगळवारी रात्री ११ वाजता संतापलेल्या नागरिक व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अचानक पुणे' सोलापूर रस्ता रोखुन धरला होता.

Bhigwan Girl Kidnapping
Deer entering village Velhe: पाण्याच्या टंचाईमुळे आंबीत चितळांची वस्ती; जंगलातून गावाकडे वन्यजीवांचा मोर्चा

आज बुधवारी दुपारपर्यंत अपहरण कर्त्या मुलीचा व आरोपींचाही शोध लावण्यात पोलिसांना यश आले नाही.दरम्यान घटनेच्या निषेधार्त भिगवण कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे तर दुपारी आमदार गोपीचंद पडळकर व संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदू जनआक्रोशव निषेध मोर्चा काढण्यात येणाऱ्या मोर्चाकडे लक्ष लागले आहे.तसेच आज बुधवारी ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल देखील भिगवण ला तळ ठोकून आहेत.

Bhigwan Girl Kidnapping
Nimone Accident Krishna Kale: निमोणेतील काळरात्र: आई-वडील गमावूनही आठवीतील कृष्णाचे आजीला धीर

भिगवण जवळील एका वस्तीवरील राहणाऱ्या मुलीचे झहीर शेख व आयन शेख यांनी अपहरण केल्यानंतर या भागात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.आरोपींना अटक करण्याची व अपहारीत मुलीला ताब्यात देण्याची मागणीने जोर धरला आहे. मंगळवारी या घटनेनंतर रात्री ११ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात मोठा तणाव निर्माण झाला होता.त्यानंतर संतापलेल्या हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, नागरिक व नातेवाईकांनी अचानक रस्त्यावर ठाण मांडले व घोषणाबाजी केली.यावरून पोलिसांनी परिस्थिती हाताळून जमाव शांत केला. तर आज बुधवारी सकाळ पासूनच पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी झाली आहे.ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत घटनेची माहिती दिली.

Bhigwan Girl Kidnapping
AI Reels Trend: एआय रील्सची सोशल मीडियावर धूम; तरुणाईमध्ये नवा डिजिटल ट्रेंड

ते म्हणाले की,घटनेतील आरोपींच्या शोधासाठी सहा पथके रवाना केली आहेत.तसेच गोपीनीय आणि तांत्रिक तपास सुरू आहे.घटनेने मंगळवारी वातावरण तणावपूर्ण झाले होते सर्व समाजाच्या प्रतिनिधी सोबत आमचे बोलणे झाले पोलीस काटेकोरपणे तपास करीत आहे त्यामुळे कोणीही ताणतणावाचे वातावरण तयार करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

पोलिसांकडून जन आक्रोश मोर्चाला कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे गिल्ल म्हणाले. संबधित पिढीत कुटुंबाला आम्ही माहिती दिली तसेच आम्ही त्यांच्याकडून देखील माहिती घेतली असल्याचे सांगत सर्व प्रतिनिधी आम्हाला सहकार्य करत आहेत व कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

Bhigwan Girl Kidnapping
Pune Police Recruitment Women Priority: लहान बाळांसह येणाऱ्या महिला उमेदवारांना पोलिस भरतीत प्रथम प्राधान्य

आरोपी आणि पीडित एकमेकांच्या घराशेजारी राहतात, ते संपर्कात होते असेही ते म्हणाले. भाजपचे जेष्ठ नेते प्रदीप गारटकर,मारुतराव वणवे आदींनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. येथील पिराचा दर्गाह मस्जिद इंडोमेंट ट्रस्ट च्या वतीने अर्थात मुस्लीम समाज ट्रस्टच्या वतीने देखील पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले आहे.यामध्ये या दुर्दैवी घटनेचा निषेध करुन आरोपींना तात्काळ अटक करण्याची व दोषारोप दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अपहरण झालेल्या मुलीचा तपासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी असे म्हटले आहे.या घटनेमुळे समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने भविष्यात अश्या घटना घडू नये असे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news