RTE Admission Process: आरटीई प्रवेशप्रक्रियेला सुरुवात; शाळा नोंदणी व व्हेरिफिकेशनसाठी 19 जानेवारीपर्यंत मुदत

2026-27 शैक्षणिक वर्षासाठी 25 टक्के आरक्षणांतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू
RTE
RTEPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेशप्रक्रियेस सुरुवात झाली आहे. 9 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीत शाळानोंदणी व व्हेरिफिकेशनची कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याचे राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

RTE
HSC Exam Hall Ticket: बारावीच्या परीक्षेचे हॉलतिकीट अखेर उपलब्ध; 12 जानेवारीपासून कॉलेजमध्ये मिळणार

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25 टक्के आरक्षित जागांवर आर्थिकदृष्ट्‌‍या दुर्बल तसेच आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इंग््राजी शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे, यासाठी ऑनलाइन पद्धतीने आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवली जाते.

RTE
Paud Gram Panchayat Irregularities: पौड ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार उघड; तत्कालीन अधिकारी व सरपंचांवर कारवाई

त्यानुसार 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने 9 जानेवारीपासून विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळानोंदणी आणि शाळा व्हेरिफिकेशनची लिंक सुरू केली आहे. शाळानोंदणीनंतरचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा शाळा व्हेरिफिकेशनचा असतो.

RTE
Mulshi Bridge Demolition: मुळशीतील कोळवण–वाळेण–डोंगरगावचा पूल तोडला; संपर्क तुटल्याने ग्रामस्थांची अडचण

तरी या अनुषंगाने सर्व संबंधितांनी शाळा व्हेरिफिकेशन करताना बंद केलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरित झालेल्या शाळा आरटीई 25 टक्के प्रवेश सन 2026-27 मध्ये प्रवीष्ट होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. याबाबत सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात येईल.

RTE
Gavthan Land Issue: केडगावमधील देशमुख मळा, धुमळीचा मळा गावांचा विकास गावठाणाअभावी ठप्प

तसेच शाळामान्यता ज्या मंडळाची आहे तेच मंडळ शाळेने नोंदणी करताना निवडले आहे का, याची खात्री करण्यात यावी. (उदा. शाळामान्यता राज्य मंडळाची आहे व नोंदणी करताना केंद्रीय मंडळ निवडले आहे.) 9 जानेवारी ते 19 जानेवारी 2026 दरम्यान शाळानोंदणी व शाळा व्हेरिफिकेशनची कार्यवाही करावी, अशा सूचना राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक गोसावी यांनी दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news