

पौड: ग््राामपंचायत कामकाजामध्ये अनियमितता आढळून आल्यामुळे पौड (ता. मुळशी) ग््राामपंचायतीच्या तत्कालीन ग््राामपंचायत अधिकारी माधुरी प्रदीप झेंडे आणि सरपंच प्रशांत वाल्हेकर यांच्यावर गटविकास अधिकारी यांनी कारवाई केली.
पौडचे सरपंच किरणकुमार आगनेन यांनी दि. 2 जानेवारीला पौड पंचायत समितीसमोर ग््राामस्थांसमवेत आंदोलन केले होते. गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी 9 जानेवारीपर्यंत दोघांनाही त्याचे म्हणणे मांडण्याची मुदत दिली होती. भागवत यांनी दिलेल्या आदेशानुसार, तत्कालीन ग््राामपंचायत अधिकारी झेंडे यांची एक वेतनवाढ रोखली आहे. झेंडे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तत्कालीन सरपंच प्रशांत वाल्हेकर यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले. याबाबत सरपंच किरणकुमार आगनेन यांनी पंचायत समितीकडे तक्रार केली होती.
पौड ग््राामपंचायतीचे तत्कालीन अधिकारी झेंडे आणि सरपंच वाल्हेकर यांच्या कार्यकाळात काही कामात भष्टाचार झाल्याचे सरपंच आगनेन यांच्या निदर्शनास आले होते. याबाबत आगनेन यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली होती. विस्तार अधिकारी एम. पी. चव्हाण यांच्यामार्फत ग््राामपंचायतीच्या दप्तराची तसेच झालेल्या विकासकामांची पाहणी करण्यात आली.
चव्हाण यांच्या अहवालात ग््राामपंचायतीचा पंधरा टक्के मागासवर्गीय निधी, शालेय साहित्य खरेदी, सीसीटीव्ही खरेदीत झेंडे यांच्या कार्यकाळात अनियमितता झाल्याचे नमूद केले. मात्र, अहवाल देऊन अनेक दिवस झाल्यानंतरही पंचायत समितीने दोषींवर कारवाई केली नाही. त्यामुळे सरपंच आगनेन ग््राामस्थांसह आंदोलन केले. त्यावेळी भागवत यांनी कारवाईचे आश्वासन दिले. शुक्रवारी (दि. 9) भागवत यांनी झेंडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले. तर तत्कालीन सरपंच वाल्हेकर यांच्यावर कारवाई होण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले.
सत्याचा विजय होतोच
तत्कालीन ग््राामपंचायत अधिकारी माधुरी झेंडे आणि सरपंच प्रशांत वाल्हेकर यांनी ग््राामपंचायतीत भष्टाचार केला आहे. अजून अनेक प्रकरणे उघडकीस येणे बाकी आहे. मात्र, त्यांच्यावर झालेली कारवाई योग्यच असून वरिष्ठ पातळीवर त्यांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करू. शेवटी सत्याचाच विजय नक्कीच होतो असे सरपंच किरण आगनेन, उपसरपंच आशा जाधव, माजी उपसरपंच प्रीती आगनेन, मोनाली ढोरे यांनी सांगितले.