

रामदास डोंबे
खोर: केडगाव (ता. दौंड) येथे असलेले देशमुख मळा आणि धुमळीचा मळा ही गावे महसुली दृष्टीने वेगळी होऊन अनेक वर्षे लोटली आहेत. त्या वेळी या गावांना गावठाण हद्द न दिल्याने आज स्थानिक विकासकामे, सार्वजनिक सोयीसुविधा आणि प्रशासनिक सुविधा पुरवण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, गावाच्या प्रगतीचा वेग खुंटला असून, ग््राामस्थांमध्ये तीव नाराजी व्यक्त होत आहे.
या गावांना सध्या कोणतीही निश्चित गावठाण जागा नसल्याने सार्वजनिक उपक्रम, शासकीय कार्यालये, पार्किंग सुविधा, सामुदायिक प्रकल्प, भविष्यातील ग््राामपंचायतीची उभारणी अशा एकाही विकासकामांसाठी जागा उपलब्ध नाही. केडगाव परिसरात तब्बल 150 एकर गायरान जमीन उपलब्ध असताना फक्त 20-20 एकर जागा या गावांच्या विकासासाठी देण्यात यावी, अशी ग््राामस्थांची ठाम मागणी आहे. ही जागा उपलब्ध झाल्यास केडगावमधील वाढते अतिक्रमण कमी होण्यास मदत होईल, तसेच पार्किंगचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागेल असे मत ग््राामस्थांनी व्यक्त केले.
केडगावपासून महसुली तुटलेली सहा गावे वेगळी झालेली आहेत. मात्र, या देशमुख मळा आणि धुमळीचा मळा या दोन गावांचा जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या बाहेरील मजूर वर्ग या भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास येत असून, गायरान जमिनीत झोपड्या व घरांची अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्याउलट स्थानिकांसाठी सार्वजनिक सोयी निर्माण करण्यासाठी तीळभरही जागा उपलब्ध नाही, हीच मोठी शोकांतिका असल्याचे ग््राामस्थ सांगतात. सन 1993 मध्ये केडगाव गावचे सरपंच आप्पासाहेब हंडाळ यांनी देशमुख मळा आणि धुमळीचा मळा ही गावे केडगावपासून महसुली वेगळी केली. मात्र, त्यावेळी गावठाण निश्चित न झाल्याने आजही ही गावे विकासाच्या दृष्टीने मागे आहेत.
स्वतंत्र तलाठी असून, देखील कार्यालयास जागा नाही
या गावांना स्वतंत्र तलाठी देण्यात आले असले तरी तलाठी कार्यालयासाठी देखील जागा उपलब्ध नाही. त्यामुळे आजही तलाठी कार्यालयाचा कारभार केडगावमध्ये बसूनच पाहावा लागतो, ही प्रशासनिक दृष्ट्या गंभीर बाब आहे. या गंभीर प्रश्नाबाबत आमदार राहुल कुल यांनी तातडीने लक्ष घालावे तसेच 20 एकर गायरान जमीन त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. लवकरच यासंदर्भात ग््राामस्थांचे निवेदन प्रशासन व दौंडचे आमदार राहुल कुल यांना सादर केले जाणार आहे.
महसुली वेगळे झालेल्या गावांना गावठाण क्षेत्र देणे गरजेचे असताना ते न दिल्याने सार्वजनिक विकासकामांसाठी जागाच नाही. त्यामुळे वेगळे करण्यात आलेल्या गावांचा विकास खुंटला असून, भविष्यात स्वतंत्र ग््राामपंचायत झाली तरी बांधकामासाठी जमीनच उपलब्ध नाही. आम्हाला जेवढे शक्य होईल तितक्या लवकर गायरानमधून जागेची उपलब्धता करून देण्याची मागणी आहे.
शहाजी नानासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, धुमळीचा मळा