Ranjangaon Mahaganpati Temple Closed: रांजणगाव महागणपती मंदिर 31 जुलैपर्यंत बंद; भाविकांना दर्शन नाही

दुरुस्ती व संवर्धनासाठी निर्णय; अष्टविनायकातील महत्त्वाचे मंदिर तात्पुरते बंद
Ranjangaon Mahaganpati Temple
Ranjangaon Mahaganpati TemplePudhari
Published on
Updated on

शिरूर: अष्टविनायकांपैकी एक असलेले रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील महागणतीचे मंदिर 15 एप्रिल ते 31 जुलै 2026 या काळात देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. याबाबत सहायक धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांनीही आदेश जारी केले आहेत.

Ranjangaon Mahaganpati Temple
National Education Policy 2020 Analysis: NEP 2020 वर आंबेडकरी दृष्टिकोन; समतेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

अष्टविनायक आराखड्यांतर्गत महाराष्ट्र शासनाने जतन व दुरुस्तीकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पुरातत्त्व विभागामार्फत या मंदिरांच्या संवर्धनाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. दरम्यान, मागील तीन महिन्यांपासून श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे दुरुस्तीची कामे सुरू आहेत. सध्या मुख्य मंदिर, तसेच परिसरातील कामे प्रगतिपथावर आहेत.

Ranjangaon Mahaganpati Temple
Pune Water Supply Shutdown: पुण्यात 16 एप्रिलला पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी साठा करावा

या अनुषंगाने देवस्थान समितीने मंदिर बंद ठेवण्याचा ठराव घेतला आहे. दर्शनासाठी मंदिर बंद असले, तरी ‌‘श्रीं‌’ची नित्य पूजाअर्चा व इतर धार्मिक विधी नियमानुसार सुरू राहतील. या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. या काळात फक्त येथील बांधकाम, दुरुस्तीची कामे करणारे अधिकारी, कामगार यांनाच प्रवेश असणार आहे.

Ranjangaon Mahaganpati Temple
Baner Land Dispute: बाणेरमध्ये बाऊन्सर्सच्या मदतीने घरे पाडली; बिल्डरवर गंभीर आरोप

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथील विकासकामे ही दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्यात येत आहे. भाविकांनी व नागरिकांनी या कामांचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Ranjangaon Mahaganpati Temple
MPSC Group B Recruitment: MPSC गट-ब भरती 2026 जाहीर; 552 पदांसाठी मोठी संधी उपलब्ध

या वेळी पुरातत्व विभाग, पुणेचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, मुख्य विश्वस्त ओमकार देव, देवस्थानच्या अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, रांजणगावच्या सरपंच सुवर्णा वायदंडे, ग््राामविकास अधिकारी गंगाधर देशमुख, रांजणगाव एमआयडीचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, ग््राामस्थ व इतर अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news