Pune Water Supply Shutdown: पुण्यात 16 एप्रिलला पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी साठा करावा

दुरुस्ती कामांमुळे शहरातील बहुतांश भाग प्रभावित; शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा
Water Supply
Water SupplyPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेची विविध जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशनमध्ये तातडीच्या दुरुस्ती आणि देखभाल कामांमुळे गुरुवारी (दि. 16) शहरातील बहुतांश भागात पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवारी (दि. 15) रात्री 12 वाजल्यापासून ते गुरुवारी (दि. 16) रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असून, शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

Water Supply
Baner Land Dispute: बाणेरमध्ये बाऊन्सर्सच्या मदतीने घरे पाडली; बिल्डरवर गंभीर आरोप

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्ती आणि स्थापत्य विषयक कामे हाती घेतली आहेत. यामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. या बंददरम्यान नवीन व जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, वडगाव जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, खडकवासला जॅकवेल तसेच भामा-आसखेड जलकेंद्र आदी ठिकाणी विद्युत, पंपिंग व स्थापत्यविषयक तातडीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

Water Supply
MPSC Group B Recruitment: MPSC गट-ब भरती 2026 जाहीर; 552 पदांसाठी मोठी संधी उपलब्ध

या कामांमुळे पर्वती, सहकारनगर, बिबवेवाडी, कात्रज, हडपसर, मुंढवा, खराडी, कोथरूड, बावधन, बाणेर, औंध, शिवाजीनगर, डेक्कन, कर्वेनगर, धायरी, सिंहगड रोड परिसर तसेच लोहगाव, विमाननगर, विश्रांतवाडी आदी उपनगरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news