MPSC Group B Recruitment: MPSC गट-ब भरती 2026 जाहीर; 552 पदांसाठी मोठी संधी उपलब्ध

PSI, STI आणि ASO पदांसह संयुक्त भरती सुरू; अर्जाची अंतिम मुदत 30 एप्रिल, पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
MPSC
MPSC Pudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त भरती 2026ची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 552 रिक्त पदे भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

MPSC
JEE Main 2026 Session 2 Answer Key: जेईई मेन्स सत्र 2 ची उत्तरसूची जाहीर; 13 एप्रिलपर्यंत आक्षेप नोंदविण्याची संधी

या भरती मोहिमेअंतर्गत सहायक कक्ष अधिकारी-06 पदे, राज्य कर निरीक्षक-236 पदे, पोलिस उपनिरीक्षक-310 पदे भरली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असून, साधारणपणे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही समकक्ष अर्हता पूर्ण केलेली असावी. पीएसआय पदासाठी विशिष्ट शारीरिक पात्रताही लागू आहे.

MPSC
CA Final Exam Changes: सीए फायनल परीक्षेत मोठा बदल; आता वर्षातून फक्त दोनदाच परीक्षा

भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट महत्त्वाची मानली जाते. जाहिरातीनुसार, सहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षकपदासाठी उमेदवाराचे वय किमान 18, तर कमाल 38 दरम्यान असणे आवश्यक आहे, तर पोलिस उपनिरीक्षकपदासाठी किमान 19 तर कमाल 31 वर्षे यादरम्यान असावे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या भरतीकडे राज्यातील हजारो उमेदवारांच्या नजरा होत्या. त्यामुळे इच्छुकांनी वेळेवर अर्ज करून परीक्षेची तयारी सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विविध प्रवर्गासाठी असे राहील परीक्षा शुल्क

मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षणनिहाय सवलती आणि इतर अटी आयोगाच्या अधिसूचनेनुसार लागू राहतील. खुला प्रवर्गातील उमेदवारांना 394 रुपये, मागसवर्गीय/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक उमेदवारांना 294 परीक्षा शुल्क भरावे लागेल. या भरती प्रक्रियेत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा टप्प्यांद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news