

रांजणगाव गणपती: महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, ग््राामीण भागातील राजकारणालाही वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांसह मतदारांचे लक्ष आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकडे लागले आहे. रांजणगाव गणपती गण व कारेगाव गणाचे आरक्षण सर्वसाधारण निघाले असून, रांजणगाव गणपती गटाचे आरक्षण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जाहीर झाल्याने या गटातील अनेक दिग्गज पुरुष इच्छुकांच्या उमेदवारीच्या शक्यता मावळल्या आहेत.
मात्र, आरक्षण महिलांसाठी असले तरी राजकीय हालचाली थांबलेल्या नाहीत. उलट आता अनेक पुरुष नेते आपल्या सौभाग्यवतींच्या उमेदवारीसाठी सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत असून, ’आपलीच सौ जिल्हा परिषद सदस्य व्हावी, हीच इच्छा’ असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी तसेच निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदारांच्या गाठीभेटी, विविध दैवतांच्या मोफत तीर्थयात्रा, तरुणांसाठी क्रिकेट स्पर्धा, बैलगाडा शर्यती, तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर, पैठणीसारखे कार्यक्रम आयोजित करून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भाजपाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य स्वाती पाचुंदकर या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाच्या वतीने आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादी काँग््रेासचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या पत्नी ज्योती पाचुंदकर यांचे नावही उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. महाविकास आघाडीच्या वतीने (राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्ष) चिंचोली मोराची येथील माजी सरपंच स्मिता गुलाबराव धुमाळ या उमेदवारीच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून रांजणगाव गणपती येथील माजी ग््राामपंचायत सदस्या नमता संदीप शिंदे या मतदारांमध्ये उमेदवारीची चाचपणी करताना दिसत आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाकडून वत्सला बाबूराव पाचंगे व वर्षा शिवाजी पाचंगे यांची नावे चर्चेत असून, उमेदवारीसाठी हालचाली सुरू असल्याचे समजते. काँग््रेास पक्षाच्या वतीने मंदा निवृत्ती गावडे यांच्याही उमेदवारीबाबत मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे.
राज्यात सध्या भाजप, राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांचे महायुती सरकार असले तरी रांजणगाव गणपती गटात याच पक्षांमध्ये मैत्रिपूर्ण लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी व निवडणूक जिंकण्यासाठी खर्चाची तयारी, विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याने रांजणगाव गणपती गटात सध्या राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे.