

पुणे: राज्यात मांडीला मांडी लावून सत्तेत असलेले भाजप, अजित पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग््रेास पक्ष व शिवसेना शिंदे गट महापालिकेच्या निवडणुकीत मात्र एकमेकांवर टीकास्त्र सोडण्यास सज्ज झाल्याचे उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीने गुंडांना तिकिटे दिल्याचा मुद्दा उपस्थित करून या लढाईला भाजपने तोंड फोडले आहे. याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत या आगामी संघर्षाची चुणूकच दाखवून दिली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप सत्तेत असून, राष्ट्रवादी कॉंग््रेासने शरद पवार राष्ट्रवादी कॉंग््रेासबरोबर आघाडी करीत भाजपला ललकारले आहे. त्यामुळे स्वाभाविकच या दोन्ही पक्षांकडून प्रचारांमुळे एकमेकांवर चढाई होणार, हे स्पष्ट झाले आहे. राज्यात सत्तेवर असलेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष मात्र अजूनही शांत असला, तरी प्रत्यक्ष प्रचारात त्यांच्याकडून कोणते मुद्दे उपस्थित केले जातात, याबाबत उत्सुकता आहे. तसे झाल्यास राज्याच्या महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपविरोधात राष्ट्रवादी आणि सेना, यांचा सामना रंगणार आहे.
अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी पुणे महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीची समीकरणे फिस्कटल्याने दोन्ही पक्ष आता एकमेकांविरुद्ध थेट रिंगणात उतरले आहेत. परिणामी भाजप, शिवसेना (शिंदे गट), दोन्ही राष्ट्रवादी गट तसेच कॉंग््रेास-शिवसेना (उबाठा)-मनसे आघाडी या प्रमुख पक्षांत चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. याचदरम्यान दोन जागा बिनविरोध झाल्याने भाजपने मतदानाआधीच विजयाची नोंद केली आहे. बंडखोरी रोखण्यात बहुतांश पक्षांना यश आले असून, एकूण 1,165 उमेदवार आता मैदानात आपले नशीब आजमावणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत 41 प्रभागांतील 165 जागांसाठी लढत रंगणार असून, त्यापैकी दोन जागा शुक्रवारी बिनविरोध ठरल्या. या दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. आधी महायुतीतून भाजप व शिवसेना (शिंदे गट) एकत्र लढण्याची आखणी होती, तर कॉंग््रेास, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीच्या नावाखाली मैदानात उतरणार होते. या पार्श्वभूमीवर अनेक बैठका झाल्या; मात्र जागा वाटपावरून मतभेद तीव झाले.
महायुतीसाठी शिवसेना (शिंदे गट) ने 30 ते 35 जागांची मागणी केली; पण भाजपकडून केवळ 10 जागांची ऑफर देण्यात आली. त्यामुळे शिंदे गटाने तब्बल 118 ठिकाणी उमेदवार उभे केले, तर भाजपने 158 आणि आरपीआयने 7 उमेदवार दिल्याने महायुतीची सूत्रे सैल झाली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग््रेास आणि राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार गट) यांनीही निश्चित कोट्यापेक्षा जास्त जागांवर उमेदवारी दिली. कॉंग््रेासने 91, शिवसेना (उबाठा)ने 71 आणि मनसेने 44 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेासकडून बंडखोरांना मनवण्याचे मोठे प्रयत्न झाले. काहींना अर्ज मागे घेण्यास तयार केले गेले, तर काहींनी उमेदवारी कायम ठेवत पक्षनेत्यांची चिंता वाढवली. महापालिकेत मुख्य लढत राष्ट्रवादी काँग््रेासविरोधात उभी करण्याची भाजपची रणनीती असली, तरी गुंडगिरीच्या आरोपांवरून दोन्ही पक्ष आता परस्परांवर टीका करीत असल्याने रंगात आणखी तीवता आली आहे.
जवळपास सर्वच पक्षांत मोठी बंडखोरी झाली आहे. 26 प्रभागांमध्ये शंभरपेक्षा अधिक जागांवर सेनेचे भाजपपुढे आव्हान कायम राहील, अशी शक्यता आहे. काही ठिकाणी उमेदवारी न मिळालेल्या भाजप बंडखोरांची मनधरणी करण्याचे काम पक्षाकडून शुक्रवारी सुरू होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेासची आघाडी झाली असली, तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेवटच्या क्षणी 70 पेक्षा अधिक जागांवर उमेदवार उभे करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण केली आहे. राष्ट्रवादीमध्ये देखील उमेदवारी न मिळालेल्या काही इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी रोखण्यासाठी अजित पवार यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले. कॉंग््रेासने 91 जागांवर उमेदवार उभे केले आहे. तर शिवसेनेने 71 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर मनसेने 44 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. अर्ज माघारी घेण्यासाठी मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर देखील काहींनी उमेदवारी मागे न घेतल्याने सर्वांसमोर बंडखोरांची डोकेदुखी कायम राहणार आहे.