पुण्यातील ‘हा’ रेल्वे उड्डाणपूल डिसेंबरअखेर होणार खुला; अखेर नागरिकांना दिलासा

पुण्यातील ‘हा’ रेल्वे उड्डाणपूल डिसेंबरअखेर होणार खुला; अखेर नागरिकांना दिलासा
Published on
Updated on

मुंढवा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या गर्डरचे (दोन्ही बाजूकडील पुलाला जोडणारा रेल्वे लाइनवरील मध्यभाग) काम पूर्णत्वास आले आहे. 'रेल्वे सेफ्टी डिव्हिजन'कडून त्याची तपासणी होणे अद्याप बाकी आहे. ती झाल्यावर पुढील प्रक्रिया वेगाने होईल व हा पूल येत्या डिसेंबर अखेर वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन असल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले.

या उड्डाणपुलाचे सप्टेंबर 2019 मध्ये भूमिपूजन झाले होते. त्या वेळी हा पूल पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याला आता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, तरी अजून पुलाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने महापालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी नागरिकांत नाराजी आहे. परिसरातील अनंत चित्रपटगृह रेल्वेगेटवर रोज सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. दिवसेंदिवस येथील वाहतूक कोंडीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उड्डाणपुलाचे काम वेगाने पूर्ण होण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलने केली आहेत. त्याची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने या पुलाचे काम वेगाने सुरू केले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन?

हा रेल्वे उड्डाणपूल येत्या डिसेंबरअखेर वाहतुकीस खुला होईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, सध्याच्या कामाचा वेग पाहता हा पूल पुढील वर्षी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. राजकीय फायद्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या पुलाचे उद्घाटन केले जाईल, अशी चर्चा नागरिकांत आहे.

या पुलाच्या गर्डरचे काम झाले आहे. 'रेल्वे सेफ्टी डिव्हिजन'कडून त्याची तपासणी अद्याप बाकी आहे. तपासणी झाल्यावर तत्काळ गर्डर बसविला जाईल व उड्डाणपुलाचे काम पूर्ण करून तो डिसेंबरअखेर वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन आहे.

– श्रीनिवास बोनाला, प्रकल्प विभाग प्रमुख, महापालिका

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news