पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात येत्या शनिवारी (दि. 16) वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची उलटतपासणी होणार आहे. या प्रकरणातील आणखी उलटतपासणी घेण्यात येणार आहे.
कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती. त्या संदर्भात कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि सदस्य निवृत्त मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.
या प्रकरणात येत्या शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची उलटतपसाणी होणार आहे. त्यासाठी ते पुन्हा हजर राहणार असून, त्या दिवशी उलटतपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची शक्यता आहे,' असे अॅड. आंबेडकर यांचे वकील अॅड. किरण कदम यांनी सांगितले. दरम्यान, दंगल झाली त्या वेळी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव होते. राव हे सध्या विभागीय आयुक्त आहेत. त्यांची उलटतपासणी अॅड. रोहन जमादार यांनी घेतली.
त्यात राव यांनी दंगल झाल्यानंतर मुख्य सचिवांना दिलेल्या पत्रात कोरेगाव भीमाच्या इतिहासाबाबत चुकीचा उल्लेख केला होता. मात्र, त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याबाबतचा खरा इतिहास मांडला आहे. तसेच ऐतिहासिक स्तंभाबाबत महसूल खात्याकडे काही पुरावे आहेत. त्या पुराव्यांच्या आधारे स्तंभाची जागा ही लष्कराची असल्याच्या उल्लेखाबाबत अॅड. जमादार यांनी राव यांची उलटतपासणी घेतली.
हेही वाचा