पाथर्डीत आडसूळ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला; एसटी कष्टकरी जनसंघाचे आंदोलन

पाथर्डीत आडसूळ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला; एसटी कष्टकरी जनसंघाचे आंदोलन
Published on
Updated on

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  एसटी बँकेच्या संचालक मंडळाने एसटी कर्मचारी सभासदांसाठी साडेसात टक्के व्याजदराने कर्ज वाटप, बिना जामीन कर्ज, असे नवीन निर्णय घेतले. या निर्णयाला बँक युनियन संघटनेचा अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी विरोध केला म्हणून त्यांच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी पाथर्डीच्या नवीन बस स्थानक प्रवेश द्वारावर बँकेच्या एसटी कामगार सभासद व एसटी कष्टकरी जनसंघाकडून प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध नोंदविला.

यावेळी एसटी कामगार संघटनेचे पाथर्डी तालुका अध्यक्ष सुनील कर्णावट, सचिव किरण गारुडकर, राज्य सरचिटणीस सुभाष खेडकर, देवदत्त अंदुरे, बाळासाहेब राठोड, विजय पारेकर, बाबासाहेब गायकवाड, संभाजी कावरे, गणेश चेमटे, किरण दहिफळे, शिवाजी जायभाय, संभाजी आव्हाड, अलका खंडागळे, सुनंदा मिसाळ आदी उपस्थित होते.

सुभाष खेडकर म्हणाले, एसटी को. ऑफ बँक कर्मचार्‍यांनी व युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी घोषित बेमुदत संप पुकारुन एसटी बँक सभासदांना देण्यात येणार्‍या कमी व्याजदरात मिळणारे कर्जास विरोध केल्याने एसटीच्या कामगारांना आर्थिक अडचणीत आणण्याचे काम केले गेले. यापूर्वी बँकेतील घोटाळे लपवण्यासाठी नवीन संचालक मंडळाला विरोध करून त्यांचे काळेपाप झाकण्याचे काम अडसूळ व त्यांचे सहकारी करत आहेत. एसटी बँक ही एसटीच्या कर्मचार्‍यांची ठेव रक्कम बाहेर राज्यात कमी व्याजाने देते; मात्र एसटीचे कर्मचारी बँकेचे सभासद असताना त्यांना मात्र ज्यादा व्याजाने कर्ज घ्यावे लागते. सिटी बँकेवर अडसूळ असताना अनेक घोटाळे केले आहेत. त्यांची आजही ईडी चौकशी चालू आहे. आशावेळी त्यांनी त्यांच्या बँक कर्मचारी युनियनला संपावर पाठविले.

एसटीतील कष्टकरी साधारण कर्मचारी असून, बँकेच्या नवीन संचालक मंडळाने कर्जबाबतीत चांगले निर्णय घेतला, त्याला अनंत अडसूळ व त्यांच्या युनियनीकडाडून विरोध केला. एसटी कष्टकरी जनसंघ यापुढेही चांगले निर्णय घेऊन कर्मचार्‍यांना न्याय देतील; मात्र पुढे अशा पद्धतीने कोणी विरोध केला तर त्याला आम्ही, शांत बसणार नाही, असाही इशारा देण्यात आला.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news