Purandar Sitaphal Price: पुरंदरच्या सीताफळाला बुरशीचा फटका; २० किलो कॅरेटला केवळ २०० ते १५०० रुपये

बदलत्या वातावरणामुळे फळांची गुणवत्ता घसरली; ३० टक्के बुरशीग्रस्त फळांची आवक, उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
Custard Apple
Custard ApplePudhari
Published on: 
Updated on: 

वाल्हे: पुरंदर तालुक्यातील सीताफळ हे देशभरात प्रसिद्ध आहे. पावसाळी बहार असलेला तालुक्यातील सीताफळ हंगाम सध्या अंतिम टप्प्यात असून, बुरशीमुळे सीताफळावरील चमक गेली आहे. त्यामुळे बाजारात या सीताफळाला समाधानकारक दर मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.

Custard Apple
Baramati Heat: पश्चिम बारामतीत ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; पाणीटंचाईची चिंता वाढली

पावसातील खंड अन् बदलत्या वातावरणाचा सीताफळाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. बाजारातील सीताफळाची आवक कमी असली, तरी ढासळलेल्या गुणवत्तेमुळे बाजारातील दरही अपेक्षित मिळत नाहीत.

Custard Apple
Ambegaon Leopard Attack: आंबेगावात पोल्ट्री फार्मवर बिबट्याचा हल्ला; ३०० कोंबड्या ठार, ४५ हजारांचे नुकसान

वाल्हे आणि परिसरात चांगल्या प्रतीच्या सीताफळांच्या २० किलो कॅरेटला २०० ते १५०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. सीताफळाला समाधानकारक दर मिळत नसल्याने उत्पादक आर्थिक संकटात सापडत आहे.

Custard Apple
Maharashtra Sports Policy: महाराष्ट्राच्या नव्या क्रीडा धोरणावर प्रश्नचिन्ह; बक्षिसांपेक्षा खेळाडू घडविण्याची व्यवस्था मजबूत करण्याची गरज

बुरशीजन्य रोगांमुळे दरावर परिणाम

पुरंदरमधील बाजारपेठेत बुरशीजन्य फळांना प्रतिकॅरेट साधारणतः २०० ते ४०० रुपये असा अत्यल्प बाजारभाव मिळत आहे. बाजारामध्ये ३० टक्के काळ्या, पांढऱ्या बुरशीजन्य फळांची आवक होते. फक्त मोठ्या आकाराची काळी फळे ही कमी बाजारभावात खरेदी केली जातात. परंतु, लहान आकाराच्या फळांना गोवा, गुजरात आणि इतर बाजारपेठांत दरच मिळत नाहीत, अशी माहिती सीताफळ व्यापारी गुणवंत राऊत यांनी दिली.

Custard Apple
Pune Crime: पुण्यात किरकोळ वादातून मित्राचा पेव्हर ब्लॉकने खून; आरोपी तीन तासांत अटकेत

यावर्षी मान्सूनपूर्व आणि मान्सून पाऊस झाला नसल्याने तसेच बुरशीमुळे सीताफळावरील नैसर्गिक चकाकी जाऊन सीताफळे काळी पडली आहेत.

संभाजी पवार, प्रगतशील सीताफळ उत्पादक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news