Ambegaon Leopard Attack: आंबेगावात पोल्ट्री फार्मवर बिबट्याचा हल्ला; ३०० कोंबड्या ठार, ४५ हजारांचे नुकसान

गावडेवाडीतील घटनेने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंता; वन विभागाकडून पंचनामा, बिबट्याचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू
Leopard
Leopard Pudhari
Published on: 
Updated on: 

मंचर: गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे प्रवीण वायाळ यांच्या पोल्ट्री फार्मवर रविवारी (दि. ४) पहाटे बिबट्याने हल्ला करून सुमारे ३०० कोंबड्या ठार केल्या. या घटनेत पोल्ट्री व्यावसायिकाचे अंदाजे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

Leopard
Maharashtra Sports Policy: महाराष्ट्राच्या नव्या क्रीडा धोरणावर प्रश्नचिन्ह; बक्षिसांपेक्षा खेळाडू घडविण्याची व्यवस्था मजबूत करण्याची गरज

पोल्ट्री फार्मची जाळी कमकुवत असल्याने बिबट्याने ती सहज तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कोंबड्यांची शिकार करून त्याने परिसरात धुमाकूळ घातला. पोल्ट्री फार्मच्या लगतच उसाचे पीक असून, या परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leopard
Pune Crime: पुण्यात किरकोळ वादातून मित्राचा पेव्हर ब्लॉकने खून; आरोपी तीन तासांत अटकेत

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून मृत कोंबड्यांचा पंचनामा केला. नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यावसायिकाला नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्यासाठी वन विभागामार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच, परिसरात वावरणाऱ्या बिबट्याचा शोध घेऊन त्याला लवकर जेरबंद करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

Leopard
Pune Seasonal Disease Monitoring: पुणे महापालिकेची विशेष यंत्रणा; ताप-अतिसाराच्या रुग्णसंख्येवर ठेवणार लक्ष

पोल्ट्री फार्ममध्ये जवळपास साडेपाच ते सहा हजार कोंबड्या होत्या. त्यातील ३०० कोंबड्या त्यांनी ठार केल्या. कोंबड्या अंदाजे २० ते २२ दिवसांच्या होत्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leopard
Pashan Chowk Traffic Congestion: पाषाण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ग्रेड सेपरेटर; तीन पर्यायी मार्गांचा प्रस्ताव

गावडेवाडी येथे बिबटहल्ल्यात मृत झालेल्या कोंबड्यांचा पंचनामा करण्यात आला आहे. नुकसानभरपाईसाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे. बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्यात येतील.

विकास भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, मंचर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news