Baramati Heat: पश्चिम बारामतीत ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; पाणीटंचाईची चिंता वाढली

बाजरी काढणीच्या कामांवर परिणाम; शेतकऱ्यांकडून सकाळ-सायंकाळ शेतीच्या कामांना प्राधान्य, आगामी महिन्यांत पाण्याचे संकट गडद होण्याची शक्यता
Water Crisis
Water CrisisPudhari
Published on: 
Updated on: 

सोमेश्वरनगर: ऑक्टोबर महिना सुरू होताच बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात उन्हाचा तडाखा पुन्हा जाणवू लागला आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत असून, अंगातून घामाच्या धारा निघत असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि नागरिक हैराण झाले आहेत.

Water Crisis
Ambegaon Leopard Attack: आंबेगावात पोल्ट्री फार्मवर बिबट्याचा हल्ला; ३०० कोंबड्या ठार, ४५ हजारांचे नुकसान

बागायती पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात आता पाण्याची टंचाईही हळूहळू जाणवू लागल्याने आगामी काळाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. सध्या पश्चिम बारामती परिसरात बाजरी काढणीचे काम सुरू आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळेत शेतात काम करणे कठीण होत असल्याने अनेक शेतकरी आणि मजूर सकाळच्या सत्रातच शेतीची कामे उरकण्याला प्राधान्य देत आहेत.

Water Crisis
Maharashtra Sports Policy: महाराष्ट्राच्या नव्या क्रीडा धोरणावर प्रश्नचिन्ह; बक्षिसांपेक्षा खेळाडू घडविण्याची व्यवस्था मजबूत करण्याची गरज

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारालाही वाढत्या उन्हाचा परिणाम जाणवत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत गावोगावी बैठका, मतदारांच्या भेटीगाठी आणि प्रचार फेऱ्या सुरू असून, दुपारच्या कडक उन्हामुळे प्रचाराचे वेळापत्रक बदलले जात आहे. सकाळी आणि सायंकाळी प्रचारावर अधिक भर दिला जात असून, दुपारच्या वेळेत प्रचाराला विश्रांती दिली जात आहे.

Water Crisis
Pune Crime: पुण्यात किरकोळ वादातून मित्राचा पेव्हर ब्लॉकने खून; आरोपी तीन तासांत अटकेत

यंदा पावसाने अपेक्षित साथ दिलेली नाही. त्यामुळे बागायती भागातही पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. सध्या उपलब्ध पाण्यावर शेतीची कामे सुरू असली तरी पुढील काही महिन्यांत पाण्याची मागणी वाढणार आहे.

Water Crisis
Pune Seasonal Disease Monitoring: पुणे महापालिकेची विशेष यंत्रणा; ताप-अतिसाराच्या रुग्णसंख्येवर ठेवणार लक्ष

डिसेंबरपर्यंत दिलासा मिळण्याची अपेक्षा असली, तरी जानेवारी ते जून हा कालावधी शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच जाणवू लागलेली उन्हाची तीव्रता शेतकऱ्यांसाठी आगामी संकटाची चाहूल ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news