Pune Crime: पुण्यात किरकोळ वादातून मित्राचा पेव्हर ब्लॉकने खून; आरोपी तीन तासांत अटकेत

भवानी पेठेतील धक्कादायक घटना; खून केल्यानंतर पसार झालेला आरोपी पोलिस ठाण्यात हजर, गुन्ह्याची कबुली
Arrested
ArrestedPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: किरकोळ वादातून मित्राच्या डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक मारून खून केल्यानंतर पसार झालेल्या आरोपीला खडक पोलिसांनी अवघ्या तीन तासांत बेड्या ठोकल्या. अजय ऊर्फ चोर राजा सुखदेव शिंदे (वय ३१, रा. महादेव मंदिराजवळ, काशेवाडी, भवानी पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आकाश ऊर्फ अक्या झुरळ्या पाटोळे (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Arrested
Pune Seasonal Disease Monitoring: पुणे महापालिकेची विशेष यंत्रणा; ताप-अतिसाराच्या रुग्णसंख्येवर ठेवणार लक्ष

दि. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री साडेआठच्या दरम्यान भवानी पेठेतील श्री मुरतजी को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. आकाश आणि अजय हे मित्र होते. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यातून अजयने आकाश यांच्या डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक मारला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आकाश यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

Arrested
Pashan Chowk Traffic Congestion: पाषाण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ग्रेड सेपरेटर; तीन पर्यायी मार्गांचा प्रस्ताव

खून केल्याची दिली कबुली

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. खडक पोलिस ठाण्यातील तपास पथक आरोपीचा शोध घेत असताना सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न जहागीरदार, पोलिस अंमलदार निलेश साबळे आणि अमित जमदाडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.

Arrested
Otur Doctor House Theft: ओतूरमध्ये डॉक्टर दाम्पत्याच्या बंद घरात धाडसी चोरी; लाखोंचा ऐवज लंपास

आकाश आणि त्याचा मित्र चोर राजा शिंदे हे अन्य दोन मित्रांसह सायंकाळी खुनाची घटना उघडकीस येईपर्यंत एकत्र काशेवाडी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या साथीदारांची नावे निष्पन्न करून त्यांचा शोध घेतला. चोर राजा हा काशेवाडी परिसरातून पळून गेल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरासह नातेवाइकांकडे आणि परिचितांकडे शोध घेतला. अखेर तो खडक पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने आकाशचा खून केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Arrested
Pune Market Yard Vegetable Rates: पुणे बाजारात पाण्याच्या तुटवड्याचा परिणाम; मिरची, वांगी, शेवगा, घेवडा महागले

वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय पिंगळे, गुन्‍हे निरीक्षक शर्मिला सुतार, समाधान पवार यांच्‍या मर्गादर्शनात अमंलदार मयुर भोसले, हेमंत पेरणे, उमेश मठपथी यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक राकेश जाधव पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news