Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग; 1523 एकर जमीन संपादन, शेतकऱ्यांना 450 कोटी

अतिरिक्त 500 कोटी निधी मंजूर; सात गावांतील भूसंपादन प्रक्रियेला मोठी गती
Purandar Airport Project
Purandar Airport ProjectPudhari
Published on
Updated on

पुणे: बहुप्रतीक्षित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, अवघ्या 15 दिवसांत सात गावांतील 1523 एकर जमीन प्रशासनाच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‌‘आकर्षक पॅकेज‌’नंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर संमतीपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे जिल्हा प्रशासनाकडे जमा केली आहेत.

Purandar Airport Project
Pune Property Tax Discount 2026: पुणेकरांसाठी शेवटची संधी; मिळकतकर सवलत फक्त 31 मेपर्यंत

जिल्हा प्रशासनाने 7 मेपासून संमतीपत्रे स्वीकारण्यास सुरुवात केली होती. या प्रक्रियेत आत्तापर्यंत 1523 एकर जमिनीसाठी 450 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यामुळे संबंधित गावांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जमीन संपादनासाठी प्रतिज्ञापत्रे आणि पूरक कागदपत्रे स्वीकारण्याची प्रक्रिया 10 जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

Purandar Airport Project
Pune Tree Cutting Controversy: महापौर बंगल्यात 21 झाडांची कत्तल; चौकशी अहवाल महिनाभरापासून रखडला

त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना अजून 15 दिवसांचा वेळ आहे. मुदतीत संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुढील टप्प्यात सक्तीने संपादित केल्या जाऊ शकतात. मात्र, अशा शेतकऱ्यांना सरकारकडून दिला जाणारा 10 टक्के जमीन परताव्याचा लाभ मिळणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Purandar Airport Project
Contaminated Water Vadgaon Sheri: वडगाव शेरीत दूषित पाणीपुरवठ्याचा कहर; 5 लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात

दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, पुरंदर विमानतळासाठी सात गावांतील 1523 एकर जमिनीची प्रतिज्ञापत्रे प्राप्त झाली आहेत. त्यासाठी 450 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. आणखी संमतीपत्रे अपेक्षित असून, राज्य सरकारने त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला आहे.

Purandar Airport Project
Katraj Kondhwa Road Widening: कात्रज-कोंढवा वाहतूक कोंडीचा तिढा सुटेना; कान्हा हॉटेल चौक ते खडीमशिन चौक मार्गात हा अडथळा

अतिरिक्त 500 कोटींचा निधी मंजूर

पुरंदर विमानतळासाठी एकूण तीन हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यातील जवळपास 50 टक्के जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मानले जात आहे. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. आता आणखी संमतीपत्रे मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त 500 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला मंजूर करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news