Pune Property Tax Discount 2026: पुणेकरांसाठी शेवटची संधी; मिळकतकर सवलत फक्त 31 मेपर्यंत

846 कोटींची वसुली पूर्ण; 5 ते 10 टक्के सूट मिळवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या मिळकतकर सवलतीचा लाभ घेण्यासाठी पाच दिवस शिल्लक राहिले असून, नागरिकांनी 31 मेपूर्वी संपूर्ण मिळकतकर भरून 5 ते 10 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाने केले आहे. मात्र, 1 एप्रिलपासून आत्तापर्यंत 4.96 लाख मिळकतधारकांनी महापालिकेच्या तिजोरीत 846.78 कोटींचा कर जमा केला आहे.

Property Tax
Contaminated Water Vadgaon Sheri: वडगाव शेरीत दूषित पाणीपुरवठ्याचा कहर; 5 लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात

महापालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षाची मिळकतकर देयके पूर्वीच नागरिकांना पाठवली आहेत. कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सर्वसाधारण करामध्ये 5 ते 10 टक्के सवलत जाहीर केलेी. मात्र, ही सवलत 31 मेपर्यंतच लागू राहणार असून, विहित मुदतीत संपूर्ण कर भरणाऱ्या नागरिकांनाच तिचा लाभ मिळणार आहे.

Property Tax
Katraj Kondhwa Road Widening: कात्रज-कोंढवा वाहतूक कोंडीचा तिढा सुटेना; कान्हा हॉटेल चौक ते खडीमशिन चौक मार्गात हा अडथळा

महापालिका हद्दीत सध्या सुमारे 15.05 लाख मिळकती असून, 1 एप्रिल ते 25 मे 2026 दरम्यान फक्त 4 लाख 96 हजार 325 मिळकतधारकांनी 846.78 कोटी रुपयांचा मिळकतकर भरला आहे. यामध्ये ऑनलाइन व डिजिटल पद्धतीला नागरिकांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे.

Property Tax
Janai Shirsai Water Release: ‘पाणी अर्ध्यावरच बंद’; खोरमधील शेतकऱ्यांचा जनाई-शिरसाई योजनेवर संताप

तब्बल 3 लाख 58 हजार 24 नागरिकांनी ऑनलाइन 557.02 कोटी रुपयांचा कर भरला असून, हे प्रमाण एकूण वसुलीच्या 72.13 टक्के आहे. तर, 51992 मिळकतधारकांनी 214.89 कोटींचा कर धनादेशाद्वारे भरला असून, 86 हजार 309 नागरिकांनी 74.87 कोटी रुपयांचा कर रोख स्वरूपात जमा केला आहे.

Property Tax
Illegal Fetal Determination Racket: पुणे जिल्ह्यात खळबळ! दौंडला गर्भलिंगनिदान रॅकेट, वाघोलीच्या डॉक्टरला अटक

कर सवलत 31 मेपर्यंतच

उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेला मिळकतकर आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांत भरल्यास 5 ते 10 टक्के करात सूट दिली जाते. त्यानंतर दरमहा दोन टक्के शास्तीची (दंड) कारवाई केली जाते. आर्थिक वर्ष संपल्यानंतरही जे कर भरत नाहीत, अशांना नोटीस पाठवली जाते. सलग काही वर्षे मिळकतकर थकलेल्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव केला जातो. मिळकतकरात 5 ते 10 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी केवळ पाच दिवस शिल्लक राहिले असून, 31 मेपासून ही सवलत बंद होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news