Katraj Kondhwa Road Widening: कात्रज-कोंढवा वाहतूक कोंडीचा तिढा सुटेना; कान्हा हॉटेल चौक ते खडीमशिन चौक मार्गात हा अडथळा

109 पैकी 100 मिळकती ताब्यात, तरी कान्हा हॉटेल ते खडीमशिन चौक भागातील जागेअभावी संपूर्ण प्रकल्प अनिश्चिततेत
Katraj Kondhwa Road Widening
Katraj Kondhwa Road WideningPudhari
Published on
Updated on

पुणे: कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पहिल्या टप्प्यातील भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असली, तरी कान्हा हॉटेल चौक ते खडीमशिन चौक दरम्यान आवश्यक जागा अद्याप ताब्यात आली नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाचे काम अपूर्ण राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Katraj Kondhwa Road Widening
Janai Shirsai Water Release: ‘पाणी अर्ध्यावरच बंद’; खोरमधील शेतकऱ्यांचा जनाई-शिरसाई योजनेवर संताप

महापालिकेने पहिल्या टप्प्यातील 50 मीटर रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या 109 मिळकतींपैकी 100 मिळकती ताब्यात घेतल्या असून, उर्वरित नऊ मिळकतीही लवकरच ताब्यात येतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. नोव्हेंबरपर्यंत हा टप्पा पूर्ण होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

Katraj Kondhwa Road Widening
Illegal Fetal Determination Racket: पुणे जिल्ह्यात खळबळ! दौंडला गर्भलिंगनिदान रॅकेट, वाघोलीच्या डॉक्टरला अटक

कात्रज ते कोंढवा (खडीमशिन चौक) हा साडेतीन किलोमीटरचा मार्ग शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक मानला जातो. वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या, मोठ्या प्रमाणावर झालेल्या बांधकामांमुळे या मार्गावर दररोज तीव वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने 2017 मध्ये हा मार्ग 84 मीटर रुंद करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. मात्र, मोठ्या प्रमाणावरील भूसंपादन, जागा उपलब्धतेचा अभाव आणि स्थानिक अडचणींमुळे प्रकल्प अनेक वर्षे रखडला.

Katraj Kondhwa Road Widening
Indapur Irrigation Water Protest: इंदापूरच्या 36 गावांचा सिंचन भवनावर बोंबाबोंब आंदोलन; उन्हाळी आवर्तनासाठी शेतकरी आक्रमक

यानंतर प्रशासनाने टप्प्याटप्प्याने काम करण्याचा निर्णय घेत पहिल्या टप्प्यात 50 मीटर रुंदीकरणाला प्राधान्य दिले. छोट्या मिळकतधारकांना टीडीआर व एफएसआय देताना अडचणी निर्माण होत असल्याने अनेकांनी रोख मोबदल्याची मागणी केली. त्यानुसार महापालिकेने थेट आर्थिक मोबदल्याद्वारे भूसंपादनाचा मार्ग स्वीकारला. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकल्पावर विशेष लक्ष केंद्रित करीत संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले होते. महसूल विभागाच्या मंजुरीनंतर एप्रिलपासून प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेला वेग आला.

Katraj Kondhwa Road Widening
Sangavi Bridge Flooding Issue: सांगवी–वाघवस्ती पुलाची उंची वाढविण्याची मागणी; पावसात वाहतूक ठप्प

भूसंपादनासाठी लागू शकते एक ते दीड वर्ष

कान्हा हॉटेल चौक ते खडीमशिन चौक या भागातील 84 मीटर रुंदीकरणासाठी आवश्यक जागा ताब्यात आलेली नसल्याने पुढील काम रखडण्याची शक्यता आहे. कान्हा हॉटेल चौकातील अंडरपासचे काम पूर्ण झाले असले, तरी पुढील भूसंपादनासाठी किमान एक ते दीड वर्ष लागू शकते. त्यामुळे कात्रज ते खडीमशिन चौक या संपूर्ण मार्गाचे रुंदीकरण या वर्षी पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news