Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळासाठी संमतिपत्राची मुदत वाढली; शेतकऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत संधी

छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी १,२१८.७५ हेक्टर जमीन आवश्यक; संमती देणाऱ्यांना विकसित भूखंड किंवा प्रतिएकर १.६१ कोटींचा मोबदला
Purandar Airport Project
Purandar Airport ProjectPudhari
Published on
Updated on

पुणे: पुरंदर तालुक्यात प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनास संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना संमतिपत्रे देण्यासाठीची मुदत आता दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या तसेच भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही मुदतवाढ दिली आहे.

Purandar Airport Project
Ganeshotsav Market Boom: दुष्काळाचे सावट, तरी गणेशोत्सवाने बाजारपेठेला दिली तेजी; देशात दीड लाख कोटींची उलाढाल

पुरंदर तालुक्यातील सात गावांमधून विमानतळासाठी जमीन संपादित केली जाणार आहे. विमानतळासाठी सुमारे १,२१८.७५ हेक्टर जमीन आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. एमआयडीसी कायद्याच्या कलम ३२(१) नुसार भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Purandar Airport Project
Pune FDA Action: एफडीएच्या कारवाईचा ‘गोड’ परिणाम; पुण्यात मिठाईचे दर ८ ते १० टक्क्यांनी वाढले

भूसंपादनास संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदल्यापोटी रोख रकमेऐवजी विकसित भूखंड देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार अंदाजे १० गुंठे विकसित भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिएकर सुमारे १ कोटी ६१ लाख १ हजार १२५ रुपये मोबदला देण्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली आहे.

Purandar Airport Project
Maharashtra Agriculture Department Structure: कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द; कृषिसेवा महासंघाचे आंदोलन स्थगित

दरम्यान, संमतिपत्रे सादर करण्यासाठी सुरुवातीला दि. ७ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ती दि. ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांकडून अधिक वेळ देण्याची मागणी होत असल्याने आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना दि. ३० सप्टेंबरपर्यंत संमतिपत्रे सादर करता येणार आहेत.

Purandar Airport Project
Pune Municipal Development Works: पुणे महापालिकेच्या विकासकामांना आचारसंहितेचा ब्रेक; भाजपच्या नियोजनावर परिणामाची शक्यता

विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मागण्यांचा विचार करून त्यांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news