Pune FDA Action: एफडीएच्या कारवाईचा ‘गोड’ परिणाम; पुण्यात मिठाईचे दर ८ ते १० टक्क्यांनी वाढले

भेसळविरोधी कारवाईचा फास आवळला; राज्यात पुणे विभाग आघाडीवर, तीन महिन्यांत ६७.२० कोटींचा अन्नसाठा जप्त
Sweets Price Hike
Sweets Price HikePudhari
Published on
Updated on

पुणे: अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नपदार्थांमधील भेसळ, नियमांचे उल्लंघन आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातील कारवाईचा फास मोठ्या प्रमाणात आवळल्याने मिठाईचा गोडवा आणि दर वाढल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे राज्यात सर्वाधिक भेसळीची कारवाईमध्ये पुणे विभाग अग्रस्थानी असून, त्यापाठोपाठ कोकण विभागाचा क्रमांक लागत आहे. दरम्यान, या कारवायांमुळे नागरिकांमध्ये भेसळ पदार्थांबाबत जनजागृती झाली असून, गुणवत्तापूर्ण पदार्थांना प्राधान्य दिले जात असल्याचेही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Sweets Price Hike
Maharashtra Agriculture Department Structure: कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द; कृषिसेवा महासंघाचे आंदोलन स्थगित

एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, जून ते ऑगस्ट २०२६ या अवघ्या तीन महिन्यांत राज्यभर तब्बल १२ हजार ८३ तपासण्या करण्यात आल्या असून, ५ हजार २६९ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये दूध, दुग्धजन्य आणि अन्य अन्नपदार्थांचा समावेश असून, ९ हजार ४८५ तपासण्या करण्यात आल्या. त्यातून ४ हजार ३२१ सुधारणा नोटिसा देण्यात आल्या, तर ४०४ परवाने निलंबित करण्यात आले. कारवाईत केवळ ५ कोटी ४० लाख रुपयांचा केवळ दूध व दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Sweets Price Hike
Pune Municipal Development Works: पुणे महापालिकेच्या विकासकामांना आचारसंहितेचा ब्रेक; भाजपच्या नियोजनावर परिणामाची शक्यता

विभागाकडे तब्बल ९,७६४ तक्रारी प्राप्त

गेल्या वर्षभरात २०२५-२६ मध्ये एफडीओकडून १४५३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील १, ३१७ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. १३६ प्रलंबित राहिल्या. मात्र, मुंढे यांना पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा बडगा उगारता जून ते सप्टेंबर या तीन महिन्यांत तक्रारींचा सात ते आठ पटीने वाढला. विभागाकडे तब्बल ९,७६४ तक्रारी प्राप्त झाल्या असून ६,१०९ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे, तर ३, ६५५ प्रलंबित आहेत. मात्र, तक्रारींचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये जागृती झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Sweets Price Hike
Baramati Loan Fraud Case: बचत गटाच्या कर्जासह ‘लाडकी बहीण’ची रक्कम परस्पर काढली; बारामतीत पती-पत्नीवर गुन्हा

याच कालावधीत ६०३ परवाने निलंबित करीत तब्बल ६७ कोटी २० लाख रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात मिठाई, पेढे, बर्फी, मोदक, खवा यांसह दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाच्या कारवाईमुळे विक्रेत्यांमध्येही खबरदारी वाढल्याचे चित्र आहे.

यंदाच्या वर्षी राज्यभरात एफडीओने केलेली कारवाई

  • पुणे - ४,२६१ - १,३२१ - १६८ - ११.४४ कोटी

  • कोकण- ३,१४२ - ९७५ - १०८ - १४.६८ कोटी

  • बृहन्मुंबई - १,४५१ - ९७२ - १२१ - १.५४ कोटी

  • नाशिक - १,३५६ - ४५७ - ५६ - ८.१३ कोटी

  • छत्रपती संभाजीनगर - १,१७३ - ५८५ - ६१ - १६.०१ कोटी

  • अमरावती - ९८९ - ५२९ - ४५ - १०.६१ कोटी

  • नागपूर - ७११ - ५२१ - ४४ - ४.७८ कोटी

  • महाराष्ट्र - १२,०८३ - ५,२६९ - ६०३ - ६७.२० कोटी

Sweets Price Hike
Baramati Fake Will Case: बनावट मृत्युपत्राने जमीन हडपण्याचा प्रयत्न; बारामतीत पाच जणांवर गुन्हा

यंदाचे प्रमुख मिठाईचे दर

  • मोदक - ४५ रु. एक नग

  • काजू बर्फी - १६०० रु. किलो

  • मावा बर्फी - ९०० रु. किलो

  • दुधातले पेढे - १००० रु. किलो

गणेशोत्सवात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, उकडीचे मोदक, खवा, मावा, दुधाची बर्फी, मोदक, काजूबर्फी आणि इतर मिठाई पदार्थांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ ते दहा टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, मागणी कायम असून त्यामध्ये घट झालेली नाही. एफडीओच्या कारवायांमुळे नागरिक गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थांना प्राधान्य देत असल्याने याचा चांगला संदेश जनसामांन्यांपर्यंत पोहचल्याचे स्पष्ट होते.

अमित गाडवे, संचालक, काका हलवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news