Pune Z Bridge Closure: पुण्यात झेड पुलावर रात्री वाहतूक बंद! दुरुस्तीमुळे महिनाभर बदल

पावसाळ्यापूर्वी महापालिकेची तयारी; 17 पुलांना तातडीच्या दुरुस्तीची गरज
Pune Z Bridge
Pune Z BridgePudhari
Published on
Updated on

पुणे: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पुलांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका प्रशासनाने दुरुस्ती मोहिमेला वेग दिला आहे. याचाच भाग म्हणून काकासाहेब गाडगीळ (झेड) पुलावर आवश्यक तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार असून, यासाठी शुक्रवार (दि. 10) पासून पुढील एक महिनाभर हा पूल दररोज रात्रीच्या वेळी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune Z Bridge
Pune Tanker Mafia: पुण्यात ‘टँकर माफिया’ पुन्हा चर्चेत! गैरप्रकारांवर लगाम घालण्यासाठी महापालिकेची कडक तयारी

महापालिकेच्या प्रकल्प विभागाने दिलेल्या माहितीनुसार, झेड बिजवरील दुरुस्तीची कामे 10 एप्रिल ते 9 मे या कालावधीत सुरू राहणार आहेत. या काळात दररोज रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. मात्र, सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत पूल नागरिकांसाठी नेहमीप्रमाणे खुला असेल. वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. झेड बिज रात्री बंद राहणार असल्याने शनिवार पेठ आणि डेक्कन परिसरात जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Pune Z Bridge
Pune Water Cut: पुण्यात पाणीकपातीची शक्यता! कमी पावसाच्या अंदाजामुळे प्रशासन सतर्क

दुरुस्तीअंतर्गत पुलाचे बेअरिंग आणि एक्स्पान्शन जॉइंट्‌‍स बदलण्याचे महत्त्वाचे तांत्रिक काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील सर्व उड्डाणपुलांचे पावसाळ्यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. दरवर्षी अशा प्रकारचे ऑडिट होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, विशेषतः जुन्या पुलांच्या मजबुतीकरणावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

Pune Z Bridge
Pune Water Cut Plan: पुण्यात पाणीकपातीची शक्यता; आठवड्यातून एक दिवस पाणीबंदचा विचार

महापालिकेचे प्रमुख मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत बांधण्यात आलेले नवीन पूल आणि नुकतेच दुरुस्त करण्यात आलेले पूल वगळता शहरातील उर्वरित 68 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आले आहे. या ऑडिट अहवालानुसार, एकूण 17 पुलांच्या बाबतीत तातडीने दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pune Z Bridge
Sakhalai Irrigation Project: साखळाई सिंचन योजनेला मंजुरी; घोड धरणाच्या पाण्यावरून विरोध

यापैकी 10 पुलांवरील कामे अंतिम टप्प्यात असून, उर्वरित कामेही पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. “नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी पुलांचे ऑडिट करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. झेड बिजवरील काम तांत्रिकदृष्ट्‌‍या महत्त्वाचे असल्याने रात्रीच्या वेळी वाहतूक बंद ठेवणे आवश्यक आहे,” असे प्रमुख मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news