Sakhalai Irrigation Project: साखळाई सिंचन योजनेला मंजुरी; घोड धरणाच्या पाण्यावरून विरोध

1234 कोटींचा प्रकल्प वादात; लाभक्षेत्रातील पाणीटंचाईची भीती व्यक्त
Ghod Dam
Ghod DamPudhari
Published on
Updated on

बापू जाधव

निमोणे: गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या साखळाई उपसा सिंचन योजनेला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून दिली आहे. विखे पाटील घराण्याच्या तीन पिढ्यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता.

Ghod Dam
Zilla Parishad School Development: वाळकी गावाचा आदर्श निर्णय; यात्रेचा निधी शाळेसाठी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भागात आपली पकड मजबूत करण्यासाठी विखे पाटलांनी 1 हजार 234 कोटी रुपये वर्ग करीत प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे. मात्र, ज्या घोड धरणावरून ही योजना कार्यान्वित होणार आहे, त्या लाभक्षेत्रातून आता प्रचंड विरोधाचा सूर उमटत आहे.

Ghod Dam
Shirur Irrigation Project: शिरूर तालुक्यात 1100 कोटींच्या सिंचन योजनेला गती

चिंचणी येथील घोड धरणाची मूळ क्षमता 7.50 टीएमसी होती; मात्र गाळामुळे ती आता केवळ 5.50 टीएमसी उरली आहे. याच साठ्यातून साखळाई योजनेसाठी 1.8 टीएमसी शेतीसाठी आणि 0.20 टीएमसी पिण्यासाठी असे एकूण 2 टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. घोड धरणावरून आधीच शिरूर शहर, रांजणगाव औद्योगिक वसाहत आणि अनेक गावांच्या जलजीवन योजना अवलंबून आहेत. उन्हाळ्यात धरणाची पातळी खालावल्याने टेलच्या भागाला पाणी पोहोचत नाही. अशा स्थितीत नवे आरक्षण दिल्यास लाभक्षेत्रात भीषण पाणीटंचाई निर्माण होईल, असा दावा अभ्यासकांनी केला आहे.

Ghod Dam
Pune Government Land Violations: पुण्यात सरकारी जमिनींच्या वापरात मोठे गैरप्रकार; 353 प्रकरणे उघड

पर्याय असताना घोडचाच अट्टहास का?

श्रीगोंदा आणि अहिल्यानगर तालुक्यातील 29 गावांना या योजनेचा लाभ होणार असून, श्रीगोंद्यातील म्हसे येथे पंपिंग हाऊस उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे, या भागातून कुकडीचा कालवा जात असताना आणि मोहरवाडी तलावातून हा प्रकल्प कमी खर्चात होणे शक्य असतानाही, विखे पाटलांनी भौगोलिकदृष्ट्‌‍या कठीण असलेल्या घोड धरणाचाच अट्टहास का धरला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Ghod Dam
Bhigwan Stray Dogs Attack: भिगवणमध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 12 वर्षीय मुलगी जखमी

प्रकल्पाचे स्वरूप

  • एकूण निधी : 1 हजार 234 कोटी रुपये

  • लाभार्थी : श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील 29 गावे

  • टप्पे : एकूण चार स्टेजमध्ये योजना कार्यान्वित होणार

  • भीती : शिरूर तालुक्यासह घोड लाभक्षेत्रातील शेती आणि उद्योगांचे पाणी धोक्यात

  • मागणी : मूळ लाभधारकांच्या हक्काच्या पाण्यावर गदा न आणता पर्यायी मार्गाचा विचार व्हावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news