Pune Voter List: माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा गंभीर आरोप; मतदार यादीतून कुटुंबीयांची नावे गायब?

विशेष पुनरावलोकन मोहिमेदरम्यान मतदार यादीतून नावे गायब झाल्याचा दावा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
Voter List
Voter ListPudhari
Published on
Updated on

पुणे: विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेदरम्यान स्वतःसह कुटुंबीयांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचा गंभीर आरोप माजी महापौर आणि माजी नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी केला आहे.

Voter List
Pune Urban Poor Scheme: शहरी गरीब योजनेतील गैरप्रकारांनंतर पुणे महापालिकेची धडक मोहीम; १७९ रुग्णालयांची होणार चौकशी

यासंदर्भात गावपातळीवरील तलाठी कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा दावा त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

Voter List
Pune Property Tax Relief: समाविष्ट ३२ गावांतील मालमत्ताधारकांना दिलासा? करआकारणीत ३५% कपातीची राष्ट्रवादीची मागणी

धनकवडे यांनी सांगितले की, धनकवडी परिसर २००२ पूर्वी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत येत होता. त्या वेळी संबंधित मतदार यादीत त्यांचे आणि कुटुंबीयांची नावे नोंदलेली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या विशेष पुनरावलोकन मोहिमेत २००२ पूर्वीच्या मतदार यादीची पडताळणी करताना त्यांची नावे आढळून येत नसल्याची माहिती बूथ लेव्हल अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) देण्यात आली.

Voter List
Kesnand Fake Revenue Orders: केसनंद बनावट महसुली आदेश प्रकरणात गुन्हा दाखल होणार; जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई

"मी १९९७ मध्ये हवेली पंचायत समितीची निवडणूक लढवली होती तसेच २००२ ते २०२४ या कालावधीत झालेल्या महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये नियमित मतदान केले आहे. असे असताना २००२ पूर्वीच्या मतदार यादीत आमची नावे नसल्याचे सांगितले जात असल्याने आश्चर्य आणि धक्का बसला आहे, असे धनकवडे यांनी नमूद केले.

Voter List
Government Office Transparency: शासकीय कार्यालयांतील दिरंगाईवर नागरिकांचा संताप; पारदर्शक कारभाराची मागणी

याबाबत सर्कल कार्यालय, तलाठी आणि बीएलओ यांच्याकडे वारंवार विचारणा करूनही स्पष्ट माहिती मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मतदार यादीतील नावांबाबत झालेल्या या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news