Pune Urban Poor Scheme: शहरी गरीब योजनेतील गैरप्रकारांनंतर पुणे महापालिकेची धडक मोहीम; १७९ रुग्णालयांची होणार चौकशी

मॅग्नम रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल; पॅनेलवरील सर्व रुग्णालयांची सेवा, नोंदणी आणि लाभार्थींची होणार सखोल पडताळणी
Hospital
HospitalPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरी गरीब योजनेच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पुणे महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. शिवाजीनगर येथील मॅग्नम रुग्णालयाने योजनेत गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवत महापालिकेने त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर आता योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्वच पॅनेलवरील रुग्णालयांची सखोल पडताळणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

Hospital
Pune Property Tax Relief: समाविष्ट ३२ गावांतील मालमत्ताधारकांना दिलासा? करआकारणीत ३५% कपातीची राष्ट्रवादीची मागणी

शहरी गरीब योजनेचे प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी याबाबत माहिती दिली. सद्य:स्थितीत महापालिकेच्या पॅनेलवर १७९ रुग्णालये नोंदणीकृत आहेत. या सर्व रुग्णालयांची नावे, नोंदणी क्रमांक आणि त्यांनी या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत किती रुग्णांना सेवा दिली, याचा लेखाजोखा तपासला जाणार आहे.

Hospital
Kesnand Fake Revenue Orders: केसनंद बनावट महसुली आदेश प्रकरणात गुन्हा दाखल होणार; जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई

विशेषतः, पॅनेलवर असूनही गेल्या काही वर्षांत ज्या रुग्णालयांनी योजनेअंतर्गत कोणतीही सेवा दिलेली नाही किंवा देयके सादर केलेली नाहीत, अशा रुग्णालयांना पॅनेलवरून तातडीने वगळले जाणार आहे. या योजनेचा लाभ नियमबाह्य व्यक्तींनी घेतल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत.

Hospital
Government Office Transparency: शासकीय कार्यालयांतील दिरंगाईवर नागरिकांचा संताप; पारदर्शक कारभाराची मागणी

आता रुग्णालयांच्याच सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने महापालिकेने या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ही धडक मोहीम हाती घेतली आहे. या तपासणीमुळे योजनेचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news