Pune Vegetable Prices Rise: पावसाचा फटका पालेभाज्यांना; पुण्यात कोथिंबिरीची जुडी ५० रुपयांवर

स्थानिक उत्पादन घटल्याने बेळगावसह परराज्यांतील आवकेवर बाजाराची भिस्त; मेथी, पालक, शेपूच्या दरातही वाढ
Vegetable Vendor
Vegetable VendorPudhari
Published on
Updated on

पुणे: जिल्ह्यासह पुणे विभागात झालेल्या पावसामुळे स्थानिक पातळीवरील पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा थेट परिणाम बाजारातील आवकेवर झाला आहे. स्थानिक उत्पादन घटल्याने पुण्याचा बाजार सध्या कर्नाटकातील बेळगावसह परराज्यांतून येणाऱ्या कोथिंबिरीवर अवलंबून आहे.

Vegetable Vendor
Pune Potholes After Rain: पहिल्याच पावसात पुण्याच्या रस्त्यांची चाळण; खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त

आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने किरकोळ बाजारात कोथिंबिरीची जुडी ५० रुपयांपर्यंत पोहचली असून, इतर पालेभाज्यांच्या दरातही पाच ते दहा टक्क्यांची वाढ झाल्याने त्याही चाळिशीवर पोहचल्या आहेत.

Vegetable Vendor
Akshar Wari: संत नामदेव महाराज: भागवत धर्माची पताका देशभर पोहोचविणारे श्रेष्ठ संतकवी

गुलटेकडी मार्केट यार्डातील पालेभाज्यांचे अडतदार राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले की, पावसामुळे शेतातील पालेभाज्या खराब होणे आणि दर्जेदार मालाचे प्रमाण घटणे, या कारणांमुळे बाजारात चांगल्या प्रतीच्या मालाची टंचाई निर्माण झाली आहे. ग्राहकांकडून दर्जेदार मालालाच पसंती मिळत असल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, मुळे, पालक आणि कांदापात यांच्या भावात वाढ झाली आहे.

Vegetable Vendor
Sant Tukaram Palkhi: नीरा स्नानानंतर संत तुकोबारायांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल; हजारो वारकऱ्यांनी केला जयघोष

मात्र, मागणी आणि पुरवठा यांचा समतोल असल्याने राजगिरा, पुदीना, अंबाडी, चुका आणि चवळईसह इतर पालेभाज्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. १९) कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी आणि मेथीची ८० हजार जुडी आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीला दर्जानुसार २० ते ४० रुपये, तर मेथीच्या जुडीला १० ते २५ रुपये भाव मिळाल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

Vegetable Vendor
Pune Vegetable Market Prices: पावसामुळे पुणे मार्केट यार्डात फळभाज्या स्वस्त; पालेभाज्या मात्र १०% पर्यंत महागल्या

पावसाच्या तडाख्यामुळे स्थानिक उत्पादनाला मोठा फटका बसल्याने बाजारातील आवक घटली आहे. पावसानंतर पडलेल्या कडक उन्हाचा परिणाम पालेभाज्यांच्या प्रतवारीवरही झाला आहे. त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक होत असली तरी दर्जाअभावी भावात मोठी वाढ झाली आहे. येत्या आठवडाभरात स्थानिक भागातून पुन्हा पालेभाज्यांची आवक सुरू होईल. त्यानंतर दरात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पाऊस वाढल्यास त्याचा फटका बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

चरण वणवे, पालेभाजी विक्रेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news