Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या निकालाला तीन महिन्यांचा विलंब; विद्यार्थ्यांचा संताप, आंदोलनाचा इशारा

बी. ए. आणि बी. कॉम. परीक्षांचे निकाल रखडले; पदव्युत्तर प्रवेश आणि नोकरीच्या संधींवर परिणाम होण्याची भीती
SPPU
SPPUPudhari
Published on
Updated on

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एप्रिल महिन्यात घेतलेल्या बी. ए. आणि बी. कॉम. परीक्षांचे निकाल तब्बल तीन महिने होत आले, तरी जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

SPPU
Pune Kasba Peth Deep Clean Drive: पुण्यात ‘स्वच्छता सप्ताह’चा वेग; कसबा पेठेत महापालिकेची विशेष ‘डीप क्लीन ड्राइव्ह’

परीक्षा विभागाच्या ढिसाळ कारभाराबद्दल विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पुढील दोन दिवसांत निकाल जाहीर न झाल्यास विद्यार्थी संघटनांकडून परीक्षा विभागासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

SPPU
Pune Missing Link Project: पुण्याच्या वाहतुकीला मिळणार नवा वेग; वर्षभरात १२ ‘मिसिंग लिंक’ पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्लॅन

विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यानंतर निकाल लावण्यास एवढा विलंब का होत आहे? याचे कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाकडून मिळालेले नाही.

SPPU
Pune Disabled Rehabilitation Centre: औंधमधील दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे काम रखडले; चार वर्षांनंतरही विस्तारित इमारत अपूर्ण

या उशिरामुळे अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेता येत नाही तसेच शासकीय आणि खासगी नोकऱ्यांच्या अर्ज प्रक्रियेत निकालाची आवश्यकता असल्याने त्यांच्या संधी निसटत आहेत. विद्यार्थी प्रतिनिधींनी सांगितले की, हा विलंब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित असल्याने परीक्षा संचालकांच्या अपयशाला जबाबदार धरले जात आहे.

SPPU
Pune Road Pothole Repair: ‘५४ खड्ड्यां’च्या दाव्याला वास्तवाचा धक्का; पुणे महापालिका खड्डे बुजविण्याच्या मोहिमेत युद्धपातळीवर

विद्यार्थ्यांनी दिलेल्या अंतिम चेतावणीनुसार, पुणे, नगर आणि नाशिक विभागातील सर्व रखडलेले निकाल दोन दिवसांत जाहीर करावेत; अन्यथा परीक्षा विभागासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या मुद्द्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news