Pune Kasba Peth Deep Clean Drive: पुण्यात ‘स्वच्छता सप्ताह’चा वेग; कसबा पेठेत महापालिकेची विशेष ‘डीप क्लीन ड्राइव्ह’

मंडई, बाजारपेठा, शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक परिसराची सखोल स्वच्छता; नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
Pune Kasba Peth Deep Clean Drive
Pune Kasba Peth Deep Clean DrivePudhari
Published on
Updated on

पुणे: महानगरपालिकेच्या ‘स्वच्छता सप्ताह’ अभियानांतर्गत शनिवारी कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत विशेष 'डीप क्लीन ड्राइव्ह' राबविण्यात आली. या मोहिमेत प्रमुख मंडई, बाजारपेठा, व्यावसायिक क्षेत्रे, शासकीय इमारती, आरोग्य कोठ्या तसेच क्षेत्रीय कार्यालय परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली.

Pune Kasba Peth Deep Clean Drive
Pune Missing Link Project: पुण्याच्या वाहतुकीला मिळणार नवा वेग; वर्षभरात १२ ‘मिसिंग लिंक’ पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्लॅन

दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शहरभर सुरू असलेल्या 'स्वच्छता सप्ताह' उपक्रमाचा भाग म्हणून परिमंडळ क्रमांक पाच अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. महापौर मंजुषा नागपुरे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली, तर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त संतोष वारुळे आणि परिमंडळाचे उपआयुक्त माधव जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेचे नियोजन करण्यात आले.

Pune Kasba Peth Deep Clean Drive
Pune Disabled Rehabilitation Centre: औंधमधील दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे काम रखडले; चार वर्षांनंतरही विस्तारित इमारत अपूर्ण

या अभियानात प्रभाग क्रमांक २२, २३ आणि २४ मधील प्रमुख मंडई, व्यापारी संकुले, शासकीय कार्यालये, आरोग्य केंद्रे आणि सार्वजनिक परिसराची स्वच्छता करण्यात आली. मोहिमेदरम्यान नगरसेवक विशाल धनवडे, पल्लवी जावळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Pune Kasba Peth Deep Clean Drive
Pune Road Pothole Repair: ‘५४ खड्ड्यां’च्या दाव्याला वास्तवाचा धक्का; पुणे महापालिका खड्डे बुजविण्याच्या मोहिमेत युद्धपातळीवर

तसेच खड्डा गॅरेज परिसरात वृक्षारोपण आणि शालेय विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटपही करण्यात आले. स्वच्छता मोहिमेत प्रभाग २२ मधील गिरिधर भवन चौक, प्रभाग २३ मधील नेहरू चौक मंडई, भोरी आळी व परिसर, तसेच प्रभाग २४ मधील ऐतिहासिक कसबा गणपती मंदिर परिसर, गणेश रोड आणि प्रमुख रस्त्यांची विशेष स्वच्छता करण्यात आली.

Pune Kasba Peth Deep Clean Drive
Baramati Illegal Liquor Action: बारामतीत अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा दणका; एकाच दिवशी ३.२५ लाखांची दारू जप्त, पाच जणांवर गुन्हे

या उपक्रमामुळे कसबा पेठेतील प्रमुख चौक आणि बाजारपेठा अधिक स्वच्छ झाल्याची प्रतिक्रिया नागरिक आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. शहर अधिक सुंदर आणि कचरामुक्त करण्यासाठी नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. मोहिमेच्या अंमलबजावणीत आरोग्य विभागाचे अधिकारी, निरीक्षक आणि मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news