Pune Disabled Rehabilitation Centre: औंधमधील दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे काम रखडले; चार वर्षांनंतरही विस्तारित इमारत अपूर्ण

निधीअभावी अंतिम टप्प्यातील बांधकाम बंद; संरक्षक भिंत, लिफ्ट, दरवाजे नसल्याने कोट्यवधींच्या कामाच्या सुरक्षिततेवर प्रश्न
Disability
DisabilityPudhari
Published on
Updated on

पुणे: औंध जिल्हा रुग्णालय परिसरात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या विस्तारित इमारतीचे बांधकाम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. सध्या ते अंतिम टप्प्यात असून, काम बंद पडले आहे. पुणे जिल्हा परिषद, पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त अर्थसाह्यातून हे दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात येत आहे.

Disability
Pune Road Pothole Repair: ‘५४ खड्ड्यां’च्या दाव्याला वास्तवाचा धक्का; पुणे महापालिका खड्डे बुजविण्याच्या मोहिमेत युद्धपातळीवर

सन २०२२ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर या इमारतीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले आहे. बांधकाम टप्प्यात निधीअभावी बंद करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीला संरक्षक भिंत, गेट, दरवाजे, लिफ्ट बसवले नसल्यामुळे आतापर्यंत झालेल्या कामाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Disability
Baramati Illegal Liquor Action: बारामतीत अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा दणका; एकाच दिवशी ३.२५ लाखांची दारू जप्त, पाच जणांवर गुन्हे

उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रातील कार्यकर्ते करीत आहेत. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या ध्येयधोरणाप्रमाणे आतापर्यंत दिव्यांगांचे सर्वेक्षण, दिव्यांगत्व प्रमाणपत्र नोंदणी, आवश्यकतेनुसार सहायक साधनांची उपलब्धता, दिव्यांगांच्या योजनांचा लाभासाठी,

Disability
Rahu Theft Case: राहूत चोरट्यांचा धुमाकूळ; घरांना बाहेरून कड्या लावून दहशत, मोटारसायकल चोरीने नागरिक भयभीत

तसेच व्यावसायिक प्रशिक्षण आणि व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करण्यासाठी मार्गदर्शन, दिव्यांगांचे व पालकांचे समुपदेशन करणे,० ते ६ वयोगटातील बालकांचे लवकर निदान लवकर उपचार इ.सेवा-सुविधांसह विविध प्रकारच्या थेरपीसाठी जागेची कमतरता भासत होती. त्यामुळे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणाखाली चार वर्षांपूर्वी विस्तारित इमारतीचे काम सुरू करण्यात आले होते.

Disability
Pune Robbery Case: एक कोटीच्या दरोडा प्रकरणात तोतया पत्रकार अटकेत; दोन पोलिस कर्मचारी सहआरोपी, पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ

दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या इमारतीमधील सुविधा

कृत्रिम अवयव निर्मिती आणि देखभाल विभाग, बहुउद्देशीय सभागृह, कौशल्य विकास प्रशिक्षण सभागृह, दिव्यांग ओपीडी विभाग, बैठक कक्ष, प्रतीक्षा कक्ष, प्रशासकीय विभाग, समुपदेशन कक्ष, बोर्ड रूम, बेरा, ओ ये इ चाचणी, बुद्ध्यांक तपासणी केंद्र, मिनी ऑडिटोरियम, समावेशित ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, ऑक्यूपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, ऑडीओमेट्री स्पीच थेरपी, म्युजिक थेरपी, डान्स थेरपी, योगा थेरपी, प्रशिक्षण वर्ग, ओपन जीम, स्विमिंग पूल, हायड्रो थेरपी, सेन्सरी गार्डन इत्यादी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news