Tuberculosis Drug Resistance Testing: पुण्यात क्षयरोगाच्या औषध-प्रतिरोधाचा जनुकीय शोध; ससून रुग्णालयात प्रथमच टीएनजीएस चाचणी

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढील महिन्यापासून संशोधन अभ्यास; ४८ नमुने वेगळे, एकाच चाचणीत अनेक औषधांवरील प्रतिरोध तपासण्यास मदत
Drug Resistance Testing
Drug Resistance TestingPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: क्षयरोगावरील औषधे निष्प्रभ का ठरतात, याचा जनुकीय पातळीवर शोध घेण्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयात प्रथमच टार्गेटेड नेक्स्ट-जनरेशन सिक्वेन्सिंग (टीएनजीएस) चाचणी करण्यात येणार. या संशोधनामुळे क्षयरोगाच्या जीवाणूंमधील औषध-प्रतिरोधकाची माहिती किंवा लक्षणे तातडीने ओळखणे शक्य होणार आहे. त्यामुळे रुग्णांसाठी अधिक परिणामकारक उपचार होण्यास मदत होणार आहे.

Drug Resistance Testing
Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचा रुग्णालयांवर ताण; खाटांसाठी प्रतीक्षा, आठवर्षीय मुलीच्या रक्तनमुन्यांची फेरतपासणी

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अभ्यासाला पुढील महिन्यापासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी आतापर्यंत ४८ नमुने वेगळे करण्यात आले आहेत. ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सामान्य क्षयरोगाच्या तसेच औषध-प्रतिरोधक क्षयरोगाच्या रुग्णांच्या नमुन्यांचे विश्लेषण केले जाणार आहे.

Drug Resistance Testing
Diwali Inflation In Maharashtra: दिवाळीत महागाईचा भडका; तूरडाळ १६० रुपये, गावरान मटकी २०० रुपये किलो

जागतिक आरोग्य संघटनेकडूनही शिफारस

जागतिक आरोग्य संघटनेनेही औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचे निदान आणि वैद्यकीय निर्णय प्रक्रियेसाठी या तंत्रज्ञानाच्या वापराची शिफारस केली आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश इंडियन ट्युबरक्यु लोसिस जिनोमिक सर्व्हिलन्स कन्सोर्टियममध्ये केली आहे.

Drug Resistance Testing
Someshwar Sugar Factory Chairman: सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी सात नावे चर्चेत; सुनेत्रा पवार कोणाला संधी देणार?

राज्य आणि केंद्र सरकारला अहवाल

या अभ्यासातून मिळणारे निष्कर्ष महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला कळविण्यात येणार आहेत. औषध-प्रतिरोधक क्षयरोगाच्या देखरेखीसाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. एकाच चाचणीत अनेक क्षयरोगविरोधी औषधांशी संबंधित प्रतिरोधाची माहिती मिळविण्याची क्षमता आणि सर्वसमावेशक तपासणीतील संभाव्य किफायतशीरपणा ही या पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. मात्र, या अभ्यासाचे निष्कर्ष आणि त्यांचा प्रत्यक्ष उपचारांवरील परिणाम समोर आल्यानंतरच या उपक्रमाची उपयुक्तता अधिक स्पष्ट होईल.

Drug Resistance Testing
Kojagiri Sarasbaug Mahalaxmi Temple: पुण्यातील सारसबाग महालक्ष्मी मंदिरात ५६ भोगांचा अन्नकोट; कोजागरी पौर्णिमा भक्तिभावात साजरी

क्षयरोगाच्या जिवाणूंमध्ये होणाऱ्या जनुकीय बदलांमुळे काही औषधे परिणामकारक ठरत नाहीत. अशा वेळी योग्य औषधांची निवड करणे हे उपचारांपुढील मोठे आव्हान असते. टीएनजीएस तंत्रज्ञानाद्वारे औषध-प्रतिरोधाशी संबंधित अनेक जनुकीय भागांची एकाच वेळी तपासणी करता येते. त्यामुळे पारंपरिक चाचण्यांमध्ये न आढळलेली काही उत्परिवर्तने शोधण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे तपासणीचे निष्कर्ष लक्षात घेऊन उपचारांची दिशा ठरवता येणार आहे.

डॉ. राजेश कार्यकर्ता, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news