Diwali Inflation In Maharashtra: दिवाळीत महागाईचा भडका; तूरडाळ १६० रुपये, गावरान मटकी २०० रुपये किलो

दुष्काळामुळे उत्पन्नावर परिणाम, किराणा खरेदी महागली; अन्नधान्य आणि कडधान्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
Inflation
InflationPudhari
Published on: 
Updated on: 

ओतूर: दुष्काळाच्या झळा आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ऐन दिवाळीत अन्नधान्य, डाळी आणि कडधान्यांच्या वाढलेल्या दरांमुळे घरखर्चाचे गणित बिघडले आहे. उत्पन्न मर्यादित असताना जीवनावश्यक वस्तूंवरील खर्च वाढत असल्याने सणाचा आनंद साजरा करताना नागरिकांना खर्चाची जुळवाजुळव करावी लागत आहे.

Inflation
Someshwar Sugar Factory Chairman: सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी सात नावे चर्चेत; सुनेत्रा पवार कोणाला संधी देणार?

डाळी, तांदूळ, खाद्यतेल, साखर, गहू, ज्वारी, बाजरीसह दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहेत. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान, उत्पादनातील घट आणि उत्पन्नाबाबतची अनिश्चितता, यामुळे या कुटुंबांच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे. वाढत्या खर्चामुळे काही कुटुंबांना गरजेच्या वस्तूंच्या खरेदीत कपात करावी लागत आहे.

Inflation
Kojagiri Sarasbaug Mahalaxmi Temple: पुण्यातील सारसबाग महालक्ष्मी मंदिरात ५६ भोगांचा अन्नकोट; कोजागरी पौर्णिमा भक्तिभावात साजरी

निश्चित उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही महागाईचा फटका बसत आहे. घरभाडे, वीजबिल, मुलांचे शिक्षण, औषधोपचार, प्रवास आणि किराणा, या नियमित खर्चामुळे बचतीसाठी कमी रक्कम शिल्लक राहत आहे. त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या खर्चासाठी पैसे राखून ठेवणेही कठीण होत आहे.

Inflation
Baramati Water Shortage: बारामतीच्या बागायती पट्ट्यात पाणीटंचाईचे संकट; वीर धरणातून निरा नदीत पाणी सोडण्याची मागणी

दरम्यान, किरकोळ बाजारातील डाळींचे दर ग्राहकांच्या चिंतेत भर घालत आहेत. तूरडाळ प्रतिकिलो १६० रुपये, मूगडाळ १३० रुपये, सफेद उडीदडाळ आणि काळी उडीदडाळ प्रत्येकी १४० रुपये, चणाडाळ ११० रुपये, तर मसूरडाळ आणि अख्खा मसूर प्रत्येकी १०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.

Inflation
Pune District Irrigation Water: पुणे जिल्ह्यातील ६६ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीकडे लक्ष

कडधान्यांचे दरही चढे आहेत. मटकीचे दर प्रतिकिलो १५० रुपयांपर्यंत असून, गावरान मटकी २०० रुपये, तर केशर कस्तुरी मटकी १८० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. चवळीचे विविध प्रकार १०० ते ११० रुपये, काबुली हरभरा १२० रुपये, काबुली बोल्ड १४० रुपये, हिरवा मूग १२० रुपये, हरभरा ९० रुपये आणि काळा वाटाणा १०० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. या दरांमुळे दिवाळीच्या खरेदीसह रोजच्या स्वयंपाकाचे बजेट सांभाळताना ग्राहकांना कसरत करावी लागत आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ऐन दिवाळीत जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांची मोठी आर्थिक अडचण होत आहे. अन्नधान्य आणि किराणा साहित्याचे दर वाढत राहिल्यास मध्यमवर्गीय कुटुंबांवरील ताण अधिक वाढू शकतो. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात राहाव्यात आणि सामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा.

कल्पेश गुगळे, घाऊक विक्रेते, नारायणगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news