Kojagiri Sarasbaug Mahalaxmi Temple: पुण्यातील सारसबाग महालक्ष्मी मंदिरात ५६ भोगांचा अन्नकोट; कोजागरी पौर्णिमा भक्तिभावात साजरी

श्री महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली देवीला अन्नकोट अर्पण; भजन संध्या, महाआरती आणि दूध प्रसादाचे आयोजन
Sarasbaug Mahalaxmi Temple Annakut Offering
Sarasbaug Mahalaxmi Temple Annakut OfferingPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे कोजागरी पौर्णिमेनिमित्त मंदिरात अन्नकोट साकारण्यात आला होता. यावेळी श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली देवीला ५६ भोगाचा अन्नकोट दाखविण्यात आला.

Sarasbaug Mahalaxmi Temple Annakut Offering
Baramati Water Shortage: बारामतीच्या बागायती पट्ट्यात पाणीटंचाईचे संकट; वीर धरणातून निरा नदीत पाणी सोडण्याची मागणी

कोजागरी पौर्णिमेनिमित्त मंदिरात भव्य भजन संध्या आणि महाआरतीचे देखील आयोजन करण्यात आले. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, विश्वस्त व उत्सवप्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, राजेश सांकला, रमेश पटोदिया, राजकुमार चमडीया, नीलेश लद्दड यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यंदाच्या नवरात्र उत्सव आणि कोजागरी कार्यक्रमाचे आयोजन केले.

Sarasbaug Mahalaxmi Temple Annakut Offering
Pune District Irrigation Water: पुणे जिल्ह्यातील ६६ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीकडे लक्ष

प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, विविध प्रकारच्या मिठाई, नमकीन यांसह ५६ प्रकारचे पदार्थ हा अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. हा भोग तिन्ही देवींना दाखविण्यात आला. याशिवाय मंदिरात दुपारी हवन, तसेच सायंकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Sarasbaug Mahalaxmi Temple Annakut Offering
Pune Dengue Cases: पुण्यातील सिंहगड रोड परिसरात डेंग्यूचा वाढता धोका; चार प्रभागांत ११२ रुग्ण

यामध्ये महिला देवीभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कोजागरी पौर्णिमेनिमित्त मंदिरात आकर्षक सजावट देखील करण्यात आली. सर्व भक्तांना प्रसाद देण्यात आला व कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने दूध प्रसादसुद्धा देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news