Pune Traffic Congestion: सिंहगड रस्त्यापुरतीच वाहतूक कोंडीची चिंता? पुणे शहरातील इतर मार्गांकडे दुर्लक्षाचा आरोप

नगर रस्ता ते हिंजवडीपर्यंत वाहतूक कोंडीचा विळखा; महापौरांच्या प्राधान्यक्रमावर नागरिकांचे प्रश्नचिन्ह
Traffic Congestion
Traffic CongestionPudhari
Published on
Updated on

पुणे: वाहतूक कोंडी हा आज शहरासमोरील सर्वात गंभीर नागरी प्रश्न बनला आहे. नगर रस्ता, सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, बाणेर, औंध, कात्रज, कोथरूड, हडपसर, हिंजवडी, विश्रांतवाडी, विमाननगर, खराडी, येरवडा, पाषाण अशा जवळपास सर्वच प्रमुख मार्गांवर नागरिक दररोज तासन् तास वाहतूक कोंडीत अडकत आहेत. मात्र, या सर्वसमावेशक समस्येवर शहरव्यापी उपाययोजना करण्याऐवजी महापौर मंजूषा नागपुरे यांनी केवळ सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीसंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन प्रशासनाला निर्देश दिल्याने त्यांच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे महापौर शहरासाठी की केवळ आपल्या प्रभागासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Traffic Congestion
Pune Tree Cutting: सातारा रस्त्यावर झाडांची ‘बोडकी’ छाटणी; महापालिकेच्या वृक्षसंवर्धनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या बैठकीत धायरी, नऱ्हे, नांदेड सिटी, वडगाव ते दांडेकर पूल परिसरातील मुख्य व पर्यायी रस्त्यांचे १५ दिवसांत सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना देण्यात आले. त्यानुसार वाहतूक वॉर्डन नेमणे, पोलिसांची संख्या वाढविणे, अनधिकृत पार्किंगवर कारवाई, अतिक्रमणे हटविणे, खड्डे बुजविणे आणि वाहतुकीस अडथळा ठरणारे बसथांबे स्थलांतरित करण्यासारख्या उपाययोजना सुचवल्या आहेत.

Traffic Congestion
Deemed Conveyance Online Process: सोसायट्यांच्या डीम्ड कन्व्हेअन्स प्रक्रियेसाठी ऑनलाइन सुविधा द्या; दोन महिन्यांत हस्तांतरण पूर्ण करण्याची मागणी

बैठकीत नगरसेवकांनी उंबऱ्या गणपती चौक ते दांडेकर पूलदरम्यान सकाळ-सायंकाळ होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. वाहतूक पोलिसांची अपुरी उपस्थिती, विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक, अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. महापौरांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही टीका करत कोंडीच्या वेळी वाहतूक सुरळीत करण्याऐवजी दंडात्मक कारवाईवर भर दिला जात असल्याचे नमूद केले. तसेच, अतिक्रमणांची माहिती वेळेत महापालिकेला देण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आले.

Traffic Congestion
Crypto Investment Fraud: क्रिप्टो गुंतवणुकीत मोठ्या नफ्याचे आमिष; सासवडमध्ये २१.७५ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

मात्र, शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न केवळ सिंहगड रस्त्यापुरता मर्यादित नाही. पुण्याच्या सर्वच प्रमुख मार्गांवर नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शहरव्यापी वाहतूक आराखडा तयार करून सर्व भागांसाठी एकत्रित उपाययोजना अपेक्षित असताना, एका भागापुरती बैठक घेऊन निर्देश देण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Traffic Congestion
Gavran Chicken Price: आखाड पार्ट्यांचा उत्साह वाढला; गावरान कोंबड्यांच्या किमती ८०० रुपयांपर्यंत पोहोचल्या

महापालिका, वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणांचा समन्वय साधून संपूर्ण शहरातील वाहतुकीसाठी एकात्मिक कृती आराखडा तयार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अन्यथा एका रस्त्यावरील उपाययोजना करून शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे शहराच्या महापौरांनी संपूर्ण पुण्याकडे समान दृष्टीने पाहून सर्व भागांसाठी ठोस आणि व्यापक उपाययोजना राबविण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात महापौर मंजूषा नागपुरे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत महापौर मंजूषा नागपुरे यांनी बैठक घेतली, ही आनंदाची गोष्ट आहे. शहरातील अनेक भागांतही दररोज वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देखील महापौरांनी पुढाकार घेतला पाहिजे.

विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

महापौर या एका प्रभागाच्या महापौर नसून, संपूर्ण शहराच्या महापौर आहेत. वाहतूक कोंडी हा संपूर्ण शहराचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी येत्या काळात संपूर्ण शहराच्या वहतुकीच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा आहे.

ॲड. नीलेश निकम, विरोधी पक्ष नेते, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news