Pune Tree Cutting: सातारा रस्त्यावर झाडांची ‘बोडकी’ छाटणी; महापालिकेच्या वृक्षसंवर्धनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

१२ ते १५ प्रौढ झाडांवर कुऱ्हाड; परवानगी कुणाची? मेट्रोच्या कामाचा दावा, पण वास्तव वेगळेच
Pune Tree Cutting
Pune Tree CuttingPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील हरित क्षेत्र सातत्याने घटत असल्याचा इशारा पुणे महापालिकेच्या पर्यावरण स्थिती अहवालातून नुकताच समोर आला असतानाच सातारा रस्त्यावर प्रौढ झाडांची करण्यात आलेली 'बोडकी' छाटणी प्रशासनाच्या वृक्षसंवर्धनाच्या दाव्यालाच छेद देणारी ठरली आहे. सुमारे १२ ते १५ झाडांवर कुऱ्हाड चालवून त्यापैकी १० ते ११ झाडांचे केवळ बुंधे शिल्लक ठेवण्यात आले आहेत.

Pune Tree Cutting
Deemed Conveyance Online Process: सोसायट्यांच्या डीम्ड कन्व्हेअन्स प्रक्रियेसाठी ऑनलाइन सुविधा द्या; दोन महिन्यांत हस्तांतरण पूर्ण करण्याची मागणी

धक्कादायक बाब म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडांची छाटणी नेमकी कुणाच्या परवानगीने, कोणत्या कारणासाठी आणि कुणाच्या फायद्यासाठी करण्यात आली, याचे उत्तर महापालिका प्रशासनालाच देता आलेले नाही. सातारा रस्त्यावरील झाडांच्या छाटणीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, अशा कारवाईची परवानगी दिल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांची छाटणी होऊनही त्याची नोंद संबंधित विभागाकडे नसल्याने महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Pune Tree Cutting
Crypto Investment Fraud: क्रिप्टो गुंतवणुकीत मोठ्या नफ्याचे आमिष; सासवडमध्ये २१.७५ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

याप्रकरणी अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दोन दिवसांपूर्वी चौकशी करून आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर दोन दिवस उलटूनही झाडांची अशी अवस्था का करण्यात आली? याचा खुलासा प्रशासनाला करता आलेला नाही. संबंधित चौकशी अहवालही अद्याप समोर आलेला नाही.

Pune Tree Cutting
Gavran Chicken Price: आखाड पार्ट्यांचा उत्साह वाढला; गावरान कोंबड्यांच्या किमती ८०० रुपयांपर्यंत पोहोचल्या

दरम्यान, महापालिकेतील एका अधिकाऱ्याने ही झाडे मेट्रोच्या कामासाठी छाटण्यात आल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता मेट्रोचे काम रस्त्याच्या एका बाजूला सुरू असताना झाडांची छाटणी विरुद्ध बाजूला करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे मेट्रोचे कारण पुढे करून प्रत्यक्षात इतर कोणाचा फायदा साधला गेला का? असा संशय अधिक गडद झाला आहे.

Pune Tree Cutting
Khadakwasla Dam Overflow: खडकवासला धरणसाखळी ओव्हरफ्लो; चारही धरणांत १०० टक्के पाणीसाठा, विसर्ग सुरू

विशेष म्हणजे, महापालिकेच्या पर्यावरण स्थिती अहवालानुसार शहरातील घनदाट हरित क्षेत्र अवघ्या ९.११ टक्क्यांवर आले आहे. अशा परिस्थितीत शहरातील प्रौढ झाडांचे संरक्षण करण्याऐवजी त्यांना अक्षरशः बुंध्यांमध्ये रूपांतरित केले जात असेल आणि त्यामागील कारणच प्रशासनाला सांगता येत नसेल, तर वृक्षसंवर्धनाच्या दाव्यांची विश्वासार्हताच धोक्यात येते. सातारा रस्त्यावरील या प्रकरणात झाडांच्या छाटणीसाठी परवानगी कोणी दिली, संबंधित जबाबदार अधिकारी कोण, प्रत्यक्ष लाभार्थी कोण आणि नियमांचे उल्लंघन झाले का, याचा सखोल खुलासा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

सातारा रस्त्यावरील झाडांच्या छाटणीबाबत चौकशी करण्यात येईल. संबंधित प्रकरणाची माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई केली जाईल.

ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news