Gavran Chicken Price: आखाड पार्ट्यांचा उत्साह वाढला; गावरान कोंबड्यांच्या किमती ८०० रुपयांपर्यंत पोहोचल्या

श्रावणापूर्वी ग्रामीण भागात मांसाहारी मेजवानीचे आयोजन; गावरान कोंबड्यांना मोठी मागणी
Chicken
ChickenPudhari
Published on
Updated on

वाल्हे: आषाढी एकादशीनंतर श्रावण मास सुरू होण्यापूर्वी ग्रामीण भागात घरोघरी आखाड पार्ट्यांचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जात आहे. आषाढाच्या उत्तरार्धातील मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी नवस फेडण्यासाठी देवाला कोंबडा किंवा बकरा अर्पण करण्याची परंपरा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत असल्याने गावरान कोंबड्यांची मागणी वाढली असून, त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

Chicken
Khadakwasla Dam Overflow: खडकवासला धरणसाखळी ओव्हरफ्लो; चारही धरणांत १०० टक्के पाणीसाठा, विसर्ग सुरू

पावसाळ्यात माशांचा विणीचा हंगाम असल्याने मासळीची उपलब्धता कमी असते. त्यामुळे आखाड पार्टीसाठी अनेकांची पसंती गावरान कोंबड्यालाच मिळत आहे. विशेषतः लाल तुरा असलेला गावरान कोंबडा खरेदीसाठी ग्राहक गावोगावी शोध घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

पावसाळा सुरू असल्याने माशांचा विणीचा हंगाम असतो. या दिवसांत मासे कमी प्रमाणात मिळतात. आखाड पार्टीचा बेत काहीसा खास असावा अन्‌ त्यासोबतीला रसरशीत गावरान कोंबड्याचा ताव असावा, असे नियोजन असणाऱ्यांनी बाजारात तसेच आजूबाजूच्या खेडेगावात फेरफटका मारायला सुरुवात केली असून, 'गावरान कोंबडा' सगळ्यांच्या पसंतीला उतरत आहे.

Chicken
Pune Licensed Street Vendors Eviction: येरवड्यात परवानाधारक पथारी व्यावसायिकांवर मध्यरात्री कारवाई; नोटीस न देता टपऱ्या हटवल्याचा आरोप

एरवी ५०० ते ५५० रुपयांना मिळणारा गावरान कोंबडा सध्या ६५० ते ८०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. आषाढाचा शेवटचा आठवडा असल्याने मंगळवारी (दि. ४) मांसविक्रीच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी होती. बुधवारीही मांसाहारी मेजवाणीचा उत्साह कायम राहणार असून, गुरुवारी अनेक जण मांसाहार टाळतात. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा आखाड पार्ट्यांना जोर येईल, असा अंदाज विक्रेते व खवय्यांकडून व्यक्त केला जात आहे. कामिका एकादशी आणि त्यानंतरच्या सोमवारी अनेक जण मांसाहार टाळत असल्याने त्यापूर्वीच आखाड पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात होत आहे.

Chicken
Crop Loan Without CIBIL: शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी सिबिलची अट नाही; आरबीआयच्या सूचनांचे पालन करण्याचे सहकार आयुक्तांचे आदेश

पूर्वी ग्रामीण भागात या काळात बोकड किंवा बकरा वाट्यावर घेण्याची पद्धत होती. मात्र, वाढते दर आणि बदलत्या खाद्यसंस्कृतीमुळे आता अनेकांचा कल गावरान कोंबडीकडे वाढला आहे. गावरान कोंबडीची बिर्याणी, रस्सा, सूप, गावरान मसाल्यातील कोंबडी, कोंबडी-वडे आणि चुलीवरील भाकरी, अशा पारंपरिक पदार्थांच्या मेजवाणीचे बेत आखले जात आहेत. शेतात किंवा शहरातील सोसायट्यांमध्ये कुटुंबीय व मित्रमंडळी एकत्र येऊन या मेजवाणीचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे.

Chicken
Fine Art Admission 2026: फाईन आर्ट प्रवेशासाठी १,३२४ विद्यार्थ्यांची अर्ज निश्चिती; २९ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार प्रवेश प्रक्रिया

सध्याचे बाजारभाव:

  • बकऱ्याचे मटण - ८०० रुपये प्रतिकिलो

  • ब्राॅयलर चिकन - २६० रुपये प्रतिकिलो

  • जिवंत कोंबडी - १८० रुपये (प्रतिनग)

  • गावरान कोंबडा - ६५० ते ७०० रुपये (प्रतिनग)

  • गावरान कोंबडी - ४०० रुपये (प्रतिनग)

  • अंडी - ७ रुपये (प्रतिनग)

(ही माहिती विक्रेते गोरख कदम यांनी दिली.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news