Pune Teacher Graduate Vote Counting: शिक्षक-पदवीधर मतमोजणीत चूक नको; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मतपत्रिकांवरील पसंतीक्रमानुसार होणार मतमोजणी; २६ ऑक्टोबरला बालेवाडीत प्रत्यक्ष प्रशिक्षण
Election Voting
Election VotingPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडावी. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी, असे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.

Election Voting
Lawrence Bishnoi Gang Pune Connection: टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर बिष्णोई टोळीचे पुणे कनेक्शन चर्चेत; व्यावसायिकांना धमक्यांचे सत्र

विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अल्पबचत भवन सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या वेळी सह आयुक्त संजय पलांडे, अपर जिल्हाधिकारी तथा महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर यांच्यासह निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी आमि कर्मचारी उपस्थित होते.

Election Voting
Pune Police De Addiction Initiative: पुणे पोलिसांचा संवेदनशील उपक्रम; १२ व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्तीची संधी, ९ जणांना न्यायालयाकडून दिलासा

मतपत्रिकांवरील पसंतीक्रमानुसार मतमोजणी होत असल्याने ही प्रक्रिया ईव्हीएमवरील मतमोजणीपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मतमोजणी निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या प्रयत्नात घाई करून चुका करू नयेत. एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे संपूर्ण पथकाचे श्रम आणि वेळ वाया जाऊ शकतो, त्यामुळे सर्वांनी समन्वयाने आणि जबाबदारीच्या जाणिवेतून काम करावे, असे तेली-उगले यांनी सांगितले.

Election Voting
Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचा वाढता धोका; काँग्रेसचा महापालिकेला ४८ तासांचा अल्टिमेटम

मतमोजणीदरम्यान मतपत्रिकांची आवश्यक पडताळणी करणे, नोंदी व्यवस्थित ठेवणे आणि संबंधित मतमोजणी प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेणे महत्त्वाचे आहे. नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियम, सूचना आणि कार्यपद्धतींचा अभ्यास करून प्रशिक्षणा दरम्यान आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे. निवडणूक कामकाजातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Election Voting
Pune Township Projects PMRDA: पुण्यातील २३ गावांमधील टाउनशिप प्रकल्पांसाठी पीएमआरडीएचीच नियुक्ती करा; क्रेडाईची मागणी

२६ ऑक्टोबरला देणार प्रत्यक्ष प्रशिक्षण

सह आयुक्त संजय पलांडे यांनी वैध व अवैध मतपत्रिकांबाबतच्या तरतुदी, मतमोजणीचे विविध टप्पे, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि निवडणूक आयोगाच्या नियमांबाबत मार्गदर्शन केले. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी २६ ऑक्टोबर रोजी बालेवाडी येथे प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये मतपेट्या उघडणे, ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे आणि मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेचे प्रात्यक्षिक देण्यात येईल, अशी माहिती अरुण आनंदकर यांनी दिली. मतमोजणी निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. प्रशिक्षणादरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. मतमोजणीतील प्रत्येक टप्पा नियमांनुसार आणि काटेकोरपणे पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना या वेळी देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news