Pune Police De Addiction Initiative: पुणे पोलिसांचा संवेदनशील उपक्रम; १२ व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्तीची संधी, ९ जणांना न्यायालयाकडून दिलासा

वारजे, नऱ्हे, उत्तमनगर आणि नांदेड सिटी पोलिसांची कारवाई; उपचार व पुनर्वसनासाठी कलम ६४(अ)चा आधार
Law
LawPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: अमली पदार्थतस्करांवर कठोर कारवाईचा बडगा उगारतानाच व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्यांना उपचार आणि पुनर्वसनाची संधी देण्याचा संवेदनशील उपक्रम पुणे पोलिसांनी राबविला आहे. परिमंडळ तीनअंतर्गत वारजे, नऱ्हे, उत्तमनगर आणि नांदेड सिटी पोलिसांनी १२ व्यसनाधीन व्यक्तींना किरकटवाडी येथील आत्मनिर्भर सोशल फाउंडेशनच्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांसाठी पाठवले.

Law
Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचा वाढता धोका; काँग्रेसचा महापालिकेला ४८ तासांचा अल्टिमेटम

या सर्वांनी एक महिन्याचा उपचार पूर्ण केला असून, त्यापैकी नऊ जणांना न्यायालयाकडून दोषमुक्‍ती (डिस्चार्ज) मिळाला आहे. उर्वरित तिघांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना केवळ गुन्हेगारीच्या चौकटीत न पाहता, त्यांना व्यसनातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर या मोहिमेत भर देण्यात आला. उपचार पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया राबवून न्यायालयात अहवाल सादर करण्यात आले.

Law
Pune Township Projects PMRDA: पुण्यातील २३ गावांमधील टाउनशिप प्रकल्पांसाठी पीएमआरडीएचीच नियुक्ती करा; क्रेडाईची मागणी

उत्तमनगर, नांदेड सिटीमध्ये तिन्ही प्रकरणांचा निकाल

वारजे पोलिसांनी उपचारांसाठी पाठविलेल्या तीन व्यक्तींपैकी एकाला न्यायालयाकडून डिस्चार्ज मिळाला असून, दोन प्रकरणे प्रलंबित आहेत. नऱ्हे पोलिसांच्या तीन प्रकरणांपैकी दोघांना दिलासा मिळाला असून, एक प्रकरण प्रलंबित आहे. उत्तमनगर आणि नांदेड सिटी पोलिसांनी प्रत्येकी तीन व्यक्तींना उपचारांसाठी पाठविले होते. या दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सर्व सहा प्रकरणांत संबंधित व्यक्तींना डिस्चार्ज मिळाला आहे.

Law
Baramati Khedkar Family Plot Fraud: खेडकर कुटुंबीयांवर प्लॉट व्यवहारात फसवणूक, मारहाणीचा आरोप; पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

कलम ६४ (अ)चा आधार

अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ६४(अ) अंतर्गत पात्र ठरणाऱ्या व्यक्तींना कायद्यातील अटींच्या अधीन राहून व्यसनमुक्ती उपचार घेतल्यास अभियोजनापासून (एखाद्या व्यक्तीला विशिष्ट कायदेशीर तरतुदींनुसार त्या गुन्ह्यासाठी न्यायालयात खटला चालविण्यापासून संरक्षण मिळणे) संरक्षण मिळू शकते. या तरतुदीचा वापर करून व्यसनाधीन व्यक्तींना उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.

Law
Pune Teacher Graduate Election: पुणे शिक्षक-पदवीधर निवडणूक: महायुतीचे दोन्ही उमेदवार जिंकणार, भाजपचा विश्वास

अमली पदार्थ विक्रेत्यांसाठी कठोर कायदा आणि व्यसनाधीन व्यक्तींसाठी उपचार व पुनर्वसनाची संधी, हीच पोलिसांची भूमिका आहे. अमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्यासाठी केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी नसून व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन देखील तितकेच आवश्यक आहे. अमली पदार्थांच्या पुरवठासाखळीवर कठोर कारवाई करण्याबरोबरच व्यसनाधीन व्यक्तींना उपचारांच्या माध्यमातून नव्याने उभे राहण्याची संधी देण्याचा हा प्रयत्न महत्त्वाचा ठरत आहे.

डॉ. सागर कवडे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news