Lawrence Bishnoi Gang Pune Connection: टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर बिष्णोई टोळीचे पुणे कनेक्शन चर्चेत; व्यावसायिकांना धमक्यांचे सत्र

बाबा सिद्दिकी हत्या आणि सिद्धू मुसेवाला प्रकरणातील आरोपींचे पुणे कनेक्शन; खंडणी व गोळीबाराच्या घटनांमुळे सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान
Bishnoi
Bishnoi Pudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेने गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळी पुन्हा चर्चेत आली आहे. या टोळीचे पुणे कनेक्शनही वारंवार समोर आले असून, खंडणीसाठी व्यावसायिकांना धमकावण्यापासून थेट गोळीबार करण्यापर्यंत टोळीची मजल गेल्याचे विविध घटनांतून पुढे आले आहे. मुंबईतील बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींचे पुणे कनेक्शन आणि फुरसुंगीतील व्यावसायिकाच्या गोदामावर झालेला गोळीबार यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील टोळीच्या गुन्हेगारी नेटवर्कचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Bishnoi
Pune Police De Addiction Initiative: पुणे पोलिसांचा संवेदनशील उपक्रम; १२ व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्तीची संधी, ९ जणांना न्यायालयाकडून दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याच्यासह अन्य आरोपींचे धागेदोरे समोर आले. पुण्यातील वारजे परिसराशी संबंधित शुभम लोणकरचे नावही या प्रकरणात पुढे आले होते. तो लॉरेन्स आणि अनमोल बिष्णोईच्या संपर्कात असल्याचा तपास यंत्रणांचा दावा होता.

Bishnoi
Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचा वाढता धोका; काँग्रेसचा महापालिकेला ४८ तासांचा अल्टिमेटम

बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अकोला पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा टोळीच्या संपर्कात आल्याची माहिती तपासात समोर आली होती. सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटात त्याचा सहभाग असल्याचे तपासात पुढे आले होते. बिष्णोई टोळीचे पुणे कनेक्शन यापूर्वीही चर्चेत आले होते. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील शार्पशूटर संतोष जाधव आणि त्याचा साथीदार सिद्धेश कांबळे ऊर्फ सौरव महाकाळ यांची नावे समोर आली होती.

Bishnoi
Pune Township Projects PMRDA: पुण्यातील २३ गावांमधील टाउनशिप प्रकल्पांसाठी पीएमआरडीएचीच नियुक्ती करा; क्रेडाईची मागणी

हे दोघे लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात असल्याचे त्या वेळी पोलिसांनी सांगितले होते. या प्रकरणामुळे पुणे जिल्ह्यातील काही आरोपींचे देशभरातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी असलेले संभाव्य संबंध चर्चेत आले होते. दुसरीकडे, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावल्याच्या घटनाही गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत.

Bishnoi
Baramati Khedkar Family Plot Fraud: खेडकर कुटुंबीयांवर प्लॉट व्यवहारात फसवणूक, मारहाणीचा आरोप; पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

फुरसुंगी परिसरातील एका व्यावसायिकाच्या गोदामावर धमकी देऊन गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे खंडणीच्या माध्यमातून दबाव निर्माण करणे आणि त्यानंतर हिंसक मार्गाचा अवलंब करणे अशा प्रकारांमुळे स्थानिक व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या खंडणीच्या बहुतांश गुन्ह्यातील आरोपींना पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक देखील केली आहे; परंतु असे असतानाही या टोळीकडून गुन्हेगारी कृत्यासाठी नवीन पंटरांचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास येते.

विविध घटनांमध्ये बिष्णोई टोळीचे नाव समोर

मुंबईतील हायप्रोफाईल हत्या प्रकरणापासून ते पुण्यातील व्यावसायिकांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांपर्यंत विविध घटनांमध्ये बिष्णोई टोळीचे नाव समोर येत असल्याने पोलिसांसमोर या नेटवर्कचे स्थानिक संपर्क शोधण्याचे आव्हान आहे. फरार आरोपींचा शोध, खंडणीच्या धमक्यांची चौकशी आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणे आवश्यक बनले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये व्यावसायिकांना लक्ष्य करून दहशत निर्माण करण्याचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news