Pune Rural Police Suspension: ₹१ कोटी दरोडा कटप्रकरणी दोन पोलिस निलंबित; आरोपींना मदत केल्याचा ठपका

खेडशिवापूर पोलिस चौकीतील महिला हवालदार आणि पोलिस नाईकावर कारवाई; सीसीटीव्हीमुळे कटाचा पर्दाफाश
Police Suspension
Police SuspensionPudhari
Published on
Updated on

पुणे: एक कोटी रुपयांच्या दरोडा कट प्रकरणात अखेर पुणे ग्रामीण पोलिस दलाने कठोर कारवाई करत राजगड पोलिस ठाण्याअंतर्गत खेडशिवापूर पोलिस चौकीतील महिला पोलिस हवालदार प्रमिला शरद निकम आणि पोलिस नाईक अजिज जब्बार इसुब मेस्त्री या दोघाना निलंबित केले आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच आरोपींना साथ दिल्याचा ठपका ठेवल्यानंतर पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी ही कारवाई केली.

Police Suspension
Gym Personal Training Refund: पर्सनल ट्रेनिंग न दिल्याने जीमला दणका; ग्राहकाला परतावा व नुकसानभरपाईचे आदेश

दोघांच्या कृत्यामुळे संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचे स्पष्ट नमूद करत त्यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड चालविण्यात आली. याप्रकरणात विक्रम विलास चाकणकर (वय ४४), अमेय अरविंद कार्ले (वय ४६), गणेश रमेश कदम (वय ३३, सर्व रा. धायरी), पत्रकार आशिष तिवारी यांना अटक झाली आहे. तर, प्रमिला निकम आणि अजिज मेस्‍त्री यांच्‍यासह इतरांनाही आरोपी केले आहे.

Police Suspension
Pune Towing Drive: पुण्यात टोइंग कारवाईवर पुन्हा प्रश्नचिन्ह; पोलिस आयुक्तांच्या एसओपीकडे दुर्लक्ष?

तपासात समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, नऱ्हे परिसरात दरोड्याचा प्रयत्न झाल्यानंतर व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांना अधिकारक्षेत्राबाहेर असलेल्या खेडशिवापूर पोलिस चौकीत नेण्यात आले. तेथे महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम हिने तोतया पत्रकार आशिष तिवारी याच्या साथीने व्यावसायिकाच्या बॅगेतील २० लाख रुपयांची रोकड बाहेर काढल्याचा गंभीर आरोप तपासात निष्पन्न झाला आहे.

Police Suspension
Khed Motorcycle Theft Case: मौजमजेसाठी बाईक चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १७ मोटारसायकली जप्त

एवढ्यावरच न थांबता उर्वरित साडेसहा लाख रुपये अधिकृत मुद्देमाल म्हणून दाखवून संपूर्ण प्रकारावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न झाल्याचे तपासातून उघड झाले. याहून गंभीर बाब म्हणजे, बॅगेतून काढलेली रोकड आशिष तिवारी याच्या मोपेडच्या डिक्कीत ठेवली आणि ती सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी महिला पोलिस हवालदाराने प्रत्यक्ष मदत केल्याचे तपासात निष्पन्‍न झाले आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिस नाईक अजिज मेस्त्री यांचाही सहभाग आढळल्याने त्यांनाही सहआरोपी केले आहे. खेडशिवापूर पोलिस चौकीत सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, समोरील हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी संपूर्ण संशयास्पद हालचाली टिपल्या आणि त्यातूनच कटाचा पर्दाफाश झाला.

Police Suspension
Yerawada Jail Security: येरवडा कारागृहाच्या सुरक्षेला धोका; अनधिकृत व्यावसायिक वापरावर कारवाईची मागणी

राजगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी गोपनीय अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सादर करत संबंधित सीसीटीव्ही फुटेज नऱ्हे पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि पोलिस कर्मचाऱ्यांचाच सहभाग उघड झाला. कायद्याचे रक्षकच आरोपींचे मदतनीस बनले, पदाचा गैरवापर केला, जप्ती प्रक्रियेत हस्तक्षेप केला, संशयितांना मदत केली आणि जनतेचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत केला. "पोलिस दलाची प्रतिमा मलिन करण्याची हीच कारणे ठरली," असे मानत पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दोघांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. दरम्यान, गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news