Pune Towing Drive: पुण्यात टोइंग कारवाईवर पुन्हा प्रश्नचिन्ह; पोलिस आयुक्तांच्या एसओपीकडे दुर्लक्ष?

उद्घोषणा, बॉडीकॅम आणि वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीच्या नियमांचे उल्लंघन; वाहनचालकांच्या तक्रारींमध्ये वाढ
Towing
TowingPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील नो-पार्किंगमधील वाहनांवर पुन्हा सुरू झालेल्या टोइंग कारवाईत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घालून दिलेल्या कार्यपद्धतीचे पालन होत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. वाहन उचलण्यापूर्वी दोनवेळा उद्घोषणा करणे, वाहनचालक जागेवर असल्यास वाहन न उचलता दंडाची कारवाई करणे, प्रत्येक कारवाईचे बॉडीकॅमद्वारे चित्रीकरण करणे आणि टोइंग वाहनावर वाहतूक शाखेचा जबाबदार अधिकारी उपस्थित ठेवणे, असे स्पष्ट आदेश असतानाही अनेक ठिकाणी या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

Towing
Khed Motorcycle Theft Case: मौजमजेसाठी बाईक चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १७ मोटारसायकली जप्त

राज्य सरकारने टोइंगचा ठेका पुढील तीन महिन्यांसाठी वाढवल्यानंतर जवळपास महिनाभर बंद असलेली कारवाई पुन्हा सुरू झाली. मात्र, सुरुवातीपासूनच वाहनचालकांकडून मनमानी कारवाईचे आरोप होत आहेत.

Towing
Yerawada Jail Security: येरवडा कारागृहाच्या सुरक्षेला धोका; अनधिकृत व्यावसायिक वापरावर कारवाईची मागणी

वाहनमालक घटनास्थळी उपस्थित असतानाही वाहने उचलली जात असल्याचे तसेच वाहन उचलण्यापूर्वी कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने वाहन टोइंग झाल्यानंतरच माहिती मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी टोइंग कारवाईवरून नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार वाद निर्माण झाल्यानंतर वाहतूक शाखेने सविस्तर मानक कार्यपद्धती लागू केली होती.

Towing
Shikrapur Missing Girl: रात्रभर शोधमोहीमेनंतर ८ वर्षीय आरोही सुखरूप सापडली; शिक्रापूर पोलिसांचे मोठे यश

माहिती अधिकारातून उघड झालेल्या त्रुटींनंतर खासगी कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप कमी करून पारदर्शकता वाढविण्याचा उद्देश होता. मात्र, नव्याने सुरू झालेल्या कारवाईत अनेक टोइंग वाहनांवर वाहतूक पोलिस कर्मचारीच अनुपस्थित असल्याचे दिसत असून, खासगी कर्मचाऱ्यां कडूनच संपूर्ण कारवाई केली जात असल्याचे चित्र आहे.

Towing
Maharashtra Kharif Sowing: खरीप पेरण्या ८२ टक्क्यांवर; सोयाबीन, कापूस आणि मक्याच्या क्षेत्रात मोठी वाढ

कारवाईदरम्यान बॉडीकॅम, व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि छायाचित्रण होत नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे कारवाईवर वाद निर्माण झाल्यास पुरावे उपलब्ध राहत नसल्याची खंत वाहनचालक व्यक्त करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news