Khed Motorcycle Theft Case: मौजमजेसाठी बाईक चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १७ मोटारसायकली जप्त

खेड पोलिसांची धडक कारवाई; दोन आरोपी अटकेत, १४ गुन्ह्यांची उकल
Khed Motorcycle Theft Case
Khed Motorcycle Theft CasePudhari
Published on
Updated on

राजगुरूनगर: मौजमजा करण्यासाठी सराईत पद्धतीने मोटारसायकली चोरून नेणाऱ्या तरुण टोळीचा पर्दाफाश करण्यात खेड पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण (डीबी) पथकाला मोठे यश मिळाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी बुधवारी (दि २९) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यावेळी उपस्थित होते.

Khed Motorcycle Theft Case
Yerawada Jail Security: येरवडा कारागृहाच्या सुरक्षेला धोका; अनधिकृत व्यावसायिक वापरावर कारवाईची मागणी

पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे १७ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून १४ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई खेड, शिक्रापूर ( ता शिरूर), पारगाव, मंचर, महाळुंगे उत्तर (ता. आंबेगाव) आणि वडूज (ता. जुन्नर) या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांचा समावेश आहे.

Khed Motorcycle Theft Case
Shikrapur Missing Girl: रात्रभर शोधमोहीमेनंतर ८ वर्षीय आरोही सुखरूप सापडली; शिक्रापूर पोलिसांचे मोठे यश

याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी सांगितले की, ८ जून २०२४ रोजी निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे बैलगाडा शर्यतीदरम्यान उभी असलेली स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच १२ टीई ९४६८) चोरट्याने नेली होती. याची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल झाली. बारामती येथे वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार दत्तात्रय भोसले आणि आकाश कांबळे यांनी तपास सुरू असताना संशयास्पद बाईकची ई-चलन प्रणालीद्वारे पडताळणी केली. बाईक चोरीची असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ खेड पोलिसांना कळविले.

Khed Motorcycle Theft Case
Maharashtra Kharif Sowing: खरीप पेरण्या ८२ टक्क्यांवर; सोयाबीन, कापूस आणि मक्याच्या क्षेत्रात मोठी वाढ

यानंतर खेडचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचला. त्यानुसार रोहित आप्पासाहेब कानगुडे (वय २२, रा. नांदगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) आणि चंद्रशेखर अनिल पवार (वय २२, रा. नांदगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) या दोघांना अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत कसून चौकशी केल्यावर आरोपींनी विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण १७ दुचाकी जप्त केल्या आणि १४ गुन्हे उघडकीस आणले.

Khed Motorcycle Theft Case
Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळी ९२ टक्क्यांवर; वरसगाव धरण ‘ओव्हरफ्लो’च्या उंबरठ्यावर

ही संपूर्ण कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत कुदळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे, महेश गरड, पोलीस हवालदार बापूसाहेब बिडकर, महेश गोसावी, सूरज राक्षे, गोकुळ कोळी, संकेत कवडे तसेच गुन्हे अन्वेषण पथकातील इतर अधिकारी-अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news