Pune Metro Skywalk: पुणे मेट्रो स्थानकांवर ‘स्काय वॉक’ची सुरक्षा कवच; ८ पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत

दोन स्काय वॉकचे काम सुरू; ज्येष्ठ नागरिक, महिला आणि प्रवाशांचा रस्ता ओलांडण्याचा त्रास होणार कमी
Pune Metro Shivajinagar Skywalk
Pune Metro Shivajinagar SkywalkPudhari
Published on
Updated on

प्रसाद जगताप

​पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारत असतानाच महामेट्रोने प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन महत्त्वाच्या स्थानकांवर 'स्काय वॉक' म्हणजेच पादचारी पुलांची उभारणी केली आहे. थेट मेट्रो स्थानकातून रस्ता पार न करता सुरक्षितपणे पोहचता यावे, यासाठी उभारलेल्या या पादचारी पुलांमुळे हजारो प्रवाशांचा दररोजचा प्रवास अत्यंत सुकर आणि सुरक्षित झाला आहे.

Pune Metro Shivajinagar Skywalk
Pune Chikoo Prices: पुणे मार्केट यार्डात चिक्कू स्वस्त; आवक वाढल्याने भावात १० टक्क्यांची घसरण

​महामेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, दहा पादचारी पूल बनवण्याचे नियोजन होते. त्यापैकी आठ पूल तयार झाले असून, ते प्रवाशांच्या सेवेत आहेत. तर, उर्वरित दोन पादचारी पुलांची कामे सध्या सुरू आहेत. यात संभाजी उद्यान मेट्रो स्थानकावरून थेट बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत येण्यासाठी पादचारी पूल उभारला आहे.

Pune Metro Shivajinagar Skywalk
Pune Market Yard Vegetable Prices: पुणे मार्केट यार्डात फळभाज्या स्वस्त; मटार, मिरची, घेवडा, टोमॅटोच्या भावात १० टक्के घसरण

याच स्थानकाला मध्यवस्तीतील वर्तकबाग ते मुठा नदी ओलांडून जोडणारा आकर्षक तानपुरा पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. याशिवाय डेक्कन जिमखाना स्थानक, पुणे रेल्वे स्टेशन, खडकी, फुगेवाडी, नळस्टॉप आणि संत तुकारामनगर स्थानकांवर, अशा एकूण आठ ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक पादचारी पूल तयार करण्यात आले आहेत.

Pune Metro Shivajinagar Skywalk
Chakan Market Onion Prices: चाकण बाजारात कांद्याचा भाव वधारला; पालेभाज्या आणि तरकारी माल स्वस्त

दोन नवीन पादचारी पुलांचे काम वेगात

मेट्रो प्रवाशांना थेट कनेक्टिव्हिटी मिळावी म्हणून बाबा भिडे पुलाजवळ आणि सिव्हिल कोर्ट येथे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाइन-३ ला जोडणाऱ्या पादचारी पुलांचे काम सध्या वेगात सुरू आहे. इतकेच नाही तर, आगामी नवीन मेट्रो लाइनच्या नियोजनातही अशाच प्रकारच्या पादचारी पुलांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Pune Metro Shivajinagar Skywalk
Pune Sugar Prices: साखरेचा दर ७२ वरून थेट ५७ रुपयांवर! केंद्राच्या नव्या नियमांचा पुणे बाजारावर मोठा परिणाम

प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांना मेट्रो स्थानकात सहज ये-जा करता यावे, याच उद्देशाने आम्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो स्थानकांवर अत्याधुनिक पादचारी पूल (स्काय वॉक) उभारले आहेत. सध्या एकूण ८ पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत पूर्ण क्षमतेने सुरू असून, उर्वरित २ पादचारी पुलांची कामे वेगाने सुरू आहेत. लवकरच तेही नागरिकांसाठी खुले केले जातील.

चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महाव्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

मेट्रो प्रशासनाने थेट स्थानकाला जोडणारे स्काय वॉक उभारल्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी प्रवास सुरक्षित आणि सोयीचा झाला आहे. आणखी मेट्रो स्थानकांना आवश्यक त्या ठिकाणी पादचारी पुलांची निर्मिती नक्कीच मेट्रो प्रशासनाने करावी.

सागर शिंदे, मेट्रो प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news