Pune Robotic Bariatric Surgery: पुण्यात पहिली रोबोटिक रिव्हिजनल बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया यशस्वी

रुबी हॉल क्लिनिकमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; लठ्ठपणावरील उपचारांसाठी नवे पर्याय उपलब्ध
Robotic Surgery
Robotic SurgeryPudhari
Published on
Updated on

पुणे: बदलती जीवनशैली, आहारातील असमतोल आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. परिणामी, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या सहव्याधीही वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर लठ्ठपणावर उपचारासाठी वैद्यकीय क्षेत्रात अद्ययावत व सुरक्षित तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. योग्य तपासण्या, वैद्यकीय पार्श्वभूमी तपासून डॉक्टरांच्या सल्ल्याने हे उपचार प्रभावी ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Robotic Surgery
Maharashtra Cooperation Department Promotion: सहकार विभागात पदोन्नतींची चाहूल; आठ अधिकाऱ्यांच्या अपर निबंधकपदी बढतीचा प्रस्ताव मंत्रालयात

लठ्ठपणाची तीवता मोजण्यासाठी बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) तपासला जातो. ज्या रुग्णांचा ‌‘बीएमआय‌’ जास्त असून, सहव्याधी आहेत किंवा आधीच्या उपचारांनंतर अपेक्षित परिणाम मिळालेले नाहीत, अशा रुग्णांसाठी बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया हा प्रभावी पर्याय ठरतो. या क्षेत्रातही तंत्रज्ञान झपाट्याने पुढे गेले असून, रोबोटच्या साहाय्याने बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित आणि परिणामकारक होत आहेत. अलीकडेच पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये शहरातील पहिली रोबोटिक रिव्हिजनल बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या शस्त्रक्रियेमध्ये पूर्वी करण्यात आलेल्या बॅरियाट्रिक शस्त्रक्रियेनंतर निर्माण झालेल्या गुंतागुंतींवर रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकाच टप्प्यात प्रभावी उपचार करण्यात आले.

Robotic Surgery
Pune Panchayat Samiti Chairman Election: पुणे जिल्ह्यात पंचायत समिती सभापती निवडीसाठी चुरस; ९ मार्चला मतदान

सध्या शस्त्रक्रियेविना वजन कमी करण्यासाठी कॅप्सूलच्या स्वरूपातील गॅस्ट्रिक बलून हा पर्याय उपयुक्त ठरत आहे. हा बलून पाण्यासोबत सहज गिळता येतो. जठरात पोहोचल्यानंतर तो फुगवण्यात येतो आणि पोटात जागा व्यापल्यामुळे लवकर पोट भरल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे भूक नियंत्रित राहून खाण्याचे प्रमाण नैसर्गिकरीत्या कमी होते. या प्रक्रियेसाठी शस्त्रक्रिया, भूल किंवा एंडोस्कोपीची गरज नसते. हा बलून चार महिन्यांपर्यंत पोटात राहून नंतर आपोआप रिकामा होतो आणि नैसर्गिकरीत्या शरीराबाहेर पडतो. योग्य आहार, व्यायाम आणि पोषणतज्ज्ञांच्या मार्गदर्शनासोबत चार महिन्यांत साधारण 15 ते 20 टक्के वजन घट होऊ शकते.

Robotic Surgery
Pune Lunar Eclipse Moksha Kal: पुण्यात खग्रास चंद्रग्रहणाचा केवळ ४-६ मिनिटांचा मोक्षकाळ

पश्चिम भारतातील बॅरियाट्रिक शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठत पहिली रोबोटिक रिव्हिजनल बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. ही जटिल शस्त्रक्रिया रोबोटिक बॅरियाट्रिक व ॲडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. केदार पाटील यांनी बहुविशेषज्ञीय टीमसह केली. संबंधित रुग्णावर सुमारे दीड वर्षांपूर्वी दुसऱ्या केंद्रात लॅप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी करण्यात आली होती. त्यानंतर तिला मध्यम आकाराचा हायटल हर्निया, आम्लपित्त (ॲसिड रिफ्लक्स) आणि लक्षणीय पित्ताशयातील खडे (गॉलस्टोन्स) अशी समस्या निर्माण झाली. प्रगत रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, रुग्णाची प्रकृती उत्तम आहे.

Robotic Surgery
Pune Municipal Store Department Irregularities: महापालिकेच्या भांडार विभागातील अनियमितता; २० अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

लठ्ठपणावरील उपचार हे एकाच साच्यात बसणारे नसून प्रत्येक रुग्णासाठी वेगळ्या पद्धतीची गरज असते. वय, बीएमआय, सहव्याधी, जीवनशैली आणि मानसिक तयारी या सर्व बाबींचा विचार करूनच उपचारपद्धती ठरवता येते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे लठ्ठपणावर मात करणे शक्य झाले असले, तरी योग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आहार व जीवनशैलीतील बदल आणि नियमित फॉलो-अप हे उपचारांच्या यशासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत.

डॉ. सुधीर देशमुख, बॅरियाट्रिक सर्जन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news